Home उद्योग वॉल्वो ईएक्स30 ची रुबाबात एन्ट्री: 39,99,000 रुपयांत प्री-रिजर्व्हची संधी

वॉल्वो ईएक्स30 ची रुबाबात एन्ट्री: 39,99,000 रुपयांत प्री-रिजर्व्हची संधी

38 second read
0
0
33

no images were found

वॉल्वो ईएक्स30 ची रुबाबात एन्ट्री: 39,99,000 रुपयांत प्री-रिजर्व्हची संधी

 

 कोल्हापूरआता प्रतीक्षा संपली. वॉल्वो कार इंडियातर्फे आज आपल्या बहुप्रतिक्षित वॉल्वो ईएक्स30च्या किंमतीची घोषणा करण्यत आली. हा ब्रॅंड सर्वाधिक सस्टेनेबल तसेच स्टाइलिश इलेक्ट्रिक कार म्हणून नावारुपाला आला आहे. 41,00,000 रुपयांच्या इंट्रोडक्टरी एक्स-शोरूम किंमतीसह ईएक्स30 लक्झरी इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या साह्याने प्रवास अगदी सुलभ करण्यासाठी तयार आहे.

या सणासुदीच्या हंगामात, वॉल्वो कार इंडियाने आपल्या डीलर्ससह दिनांक 19 ऑक्टोबर 2025 पूर्वी प्री-रिजर्व्ह केलेल्या ग्राहकांना 39,99,000 रुपयांच्या विशेष किंमतीत ईएक्स30 बुक करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. ही विशेष ऑफर मर्यादित कालावधीसाठी वैध आहे. तरीच अधिक माहितीसाठी, ग्राहकांना त्यांच्या जवळच्या विक्रेत्याशी संपर्क साधता येईल. ही कार पाच रंगांमध्ये उपलब्ध असेल आणि नोव्हेंबर 2025 च्या पहिल्या आठवड्यापासून डिलिव्हरी करण्यात येईल.

यंदा सणासुदीच्या मोसमात वॉल्वो कार इंडिया आपले डीलर/ विक्रेत्यांसह एकत्र येऊन दिनांक 19 ऑक्टोबर, 2025 अगोदर प्री-रिझर्व्ह करणाऱ्या ग्राहकांना 39,99,000 रुपयांच्या विशेष किंमतीत ईएक्स30 बुकिंग संधी उपलब्ध करून आनंदाची लयलूट करते आहे. ही स्पेशल प्री-रिजर्व्ह किंमत मर्यादित वेळेकरिता असेल. अधिक माहितीकरिता ग्राहक आपल्या जवळच्या  विक्रेत्यांना संपर्क करू शकतात. ही कार पाच रंगांत उपलब्ध होईल तसेच हिची डिलिव्हरी नोव्हेंबर, 2025 च्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होईल.

वॉल्वोचे हे तिसरे ईव्ही मॉडेल असून ते कंपनीच्या होसकोटे, बंगळुरू येथील कारखान्यात तयार करण्यात आले आहे. प्रत्येक ईएक्स30 स्टँडर्ड ऑफर म्हणून 11 किलोवॅट चार्जरसह येईल. ईएक्स30 शाश्वत गतिशीलता, नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान, भविष्यावर आधारित रचना आणि एकूण सुरक्षिततेसाठी वॉल्वोची वचनबद्धता प्रतिबिंबित करते.

ईएक्स30 मध्ये 8 वर्षांची बॅटरी वॉरंटी आणि वॉल बॉक्स चार्जर आहे. त्याच्या डिजिटल ‘की’ कार्यक्षमतेसह, कार सोयीची व्याख्या नव्याने रचते. एनएफसीचा वापर करून, केवळ कार्ड टॅप करून कार अनलॉक करणे शक्य आहे. वॉल्वो कार अॅपवरील डिजिटल ‘की’ प्लसच्या मदतीने, तुमचा फोन देखील एक किल्ली म्हणून काम करतो, जो एक सोपा आणि स्मार्ट अनुभव देऊ करतो.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In उद्योग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

डिजिटल अध्यापनासाठी प्राध्यापकांना विशेष प्रशिक्षण

डिजिटल अध्यापनासाठी प्राध्यापकांना विशेष प्रशिक्षण        &n…