no images were found
“तिचा ठोसा इतका जबरदस्त असेल याची मला कल्पना नव्हती!”ऋषी सक्सेना
हृदयस्पर्शी आणि भावनिकदृष्ट्या समृद्ध कथानक असलेल्या सोनी सबवरील ‘इत्ती सी खुशी’ मालिकेला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या कथानकात केंद्रस्थानी अन्विता (सुंबुल तौकीर खान) ही 21-वर्षीय तरुणी आहे, जिच्यावर आपल्या आईच्या अनुपस्थितीमुळे आणि वडिलांच्या व्यसनाधीनतेमुळे कुटुंबाची जबाबदारी येऊन पडली आहे. आपल्या 5 लहान भावंडांचा सांभाळ करून आपले कुटुंब एकत्रित ठेवण्याची तिची धडपड आहे. तिची लवचिकता आणि जीवनातील छोटे छोटे आनंद टिपण्याची वृत्ती प्रेक्षकांना भावली आहे.
तिच्या आयुष्यात संजयचे महत्त्वपूर्ण स्थान आहे. ही भूमिका ऋषी सक्सेनाने साकारली आहे. संजय एक सद्वर्तनी पोलीस आणि अन्विताचा बालपणीचा मित्र आहे. अलीकडच्या भागांमध्ये प्रेक्षकांनी संजयची हळुवार बाजू पाहिली आहे. त्याचे खूप पूर्वीपासून अन्वितावर प्रेम आहे आणि तिला खुश करण्यासाठी तो हर तऱ्हेने प्रयत्न करत असतो. त्यांच्या नात्यात बालपणीचा मोकळेपणा आणि आता नवीन भावनांचा स्तर आहे, ज्यामुळे कथानकात मोहकता आली आहे आणि प्रेक्षकांमध्ये तो चर्चेचा विषय होऊ लागला आहे.
गंमत म्हणजे, पडद्यावरील त्यांच्या नात्यात नर्म रोमान्स आणि संयत भावना दिसतात पण पडद्यामागच्या त्यांच्या नात्यात मात्र खूप मस्ती आणि हास्य-विनोद आहे. सेटवर अलीकडेच सुंबुलची खेळकर बाजू समोर आली, आणि ती पाहून सर्वजण विस्मयचकित झाले. दोन शॉट्सच्या दरम्यान, सुंबुल मजेमजेत ठोसे मारत होती तेव्हा ऋषीने तिला एक अस्सल ठोसा देण्यासाठी प्रोत्साहन दिले. तेव्हा त्याला इशारा देत सुंबुलने त्याला खरोखर एक ठोसा दिला, जो भलताच जोरदार होता!
त्या क्षणाची आठवण काढत ऋषी हसत हसत म्हणाला, “खरं सांगतो, तो ठोसा जबरदस्त होता! नंतर सुंबुलने सांगितले की ती बॉक्सिंग शिकली आहे. तिचा ठोसा इतका जोरदार असेल याची मी कल्पनाच केली नव्हती.”
तो पुढे म्हणाला, “सुंबुल ज्या प्रकारे पडद्यावर आणि पडद्याच्या मागे आपल्या ऊर्जेचा समतोल साधते, ते खरोखर विलक्षण आहे. अन्विता म्हणून ती ठरेल, संयत आहे आणि भावनांचे ओझे वाहते. पण दोन शॉट्सच्या मध्ये मात्र तिच्यातली ऊर्जा उफाळून येते – ती मस्तीखोर, खोडकर असते आणि उत्साहाने सळसळत असते. तिच्यातील या समतोलामुळे तिच्यासोबत काम करताना मजा येते.”