Home स्पोर्ट्स उत्तूर मधील गणेशोत्सवानिमित्त आयोजित खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत ११७ बुद्धिबळपटू सहभागी.

उत्तूर मधील गणेशोत्सवानिमित्त आयोजित खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत ११७ बुद्धिबळपटू सहभागी.

30 second read
0
0
72

no images were found

उत्तूर मधील गणेशोत्सवानिमित्त आयोजित खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत ११७ बुद्धिबळपटू सहभागी.

                            सोमवार (प्रतिनिधी) :- चेस असोसिएशन कोल्हापूरच्या मान्यतेने अवधूत कला क्रिडा व सांस्कृतिक मंडळ इंदिरानगर,उत्तूर (ता. आजरा) यांनी गणेशोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या भव्य खुल्या बुद्धिबळ स्पर्धा मोठ्या उत्साहात प्रारंभ झाल्या. या स्पर्धेत कोल्हापूर,इचलकरंजी, गडहिंग्लज,सांगली व स्थानिक आजरा उत्तुर येथील नामवंत ११७  बुद्धिबळपटूंनी सहभाग घेतला आहे. या स्पर्धा जलद बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय नियमानुसार स्विस् लीग पद्धतीने एकूण सात फेऱ्यात होणार आहेत. स्पर्धा विजेत्यास रोख तीन हजार रुपये व सन्मान चिन्ह उपविजेत्यास रोख पंधराशे रुपये व सन्मान सन्मानचिन्ह तर तृतीय क्रमांकास रोख एक हजार  रुपये व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. मुख्य दहा बक्षिसे व उत्तेजनार्थ पंधरा बक्षीसे अशी एकूण २५ बक्षिसे  रोख रक्कम, सन्मानचिन्ह, मेडल व प्रमाणपत्र स्वरूपात देण्यात येणार आहे.

      श्री.गंगाधर हराळे,मारुतीराव घोरपडे,गणपती सांगले,संजय बरडे,उत्तम बरडे, भिकाजी येजरे,युवराज कातवरे, विजय बरडे,दत्तात्रय केसरकर  यांच्या हस्ते स्पर्धेचा उदघाटन  समारंभ संपन्न झाला.वरिष्ठ राष्ट्रीय पंच रोहित पोळ हे मुख्य पंच म्हणून काम पाहत आहेत त्यांना महेंद्र कामत, शंकर सावंत सर, करण दबडे व शशिकांत चव्हाण हे सहाय्यक पंच म्हणून सहकार्य करत आहेत.

      सुनील पोवार,प्रथमेश बरडे,विशाल जाधव,सौरभ हारळे,देवदत्त काळगे व इतर सहकारी मंडळीं स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेत आहेत.आज झालेल्या स्पर्धेच्या चौथ्या फेरीनंतर आदित्य सावळकर ,ऋषिकेश कबनूरकर ,स्वरूप साळवे, अथर्व तावरे, प्रेम निचल,श्रेयस गाताडे, अरिन कुलकर्णी व समर्थ पोवार हे आठ जण चार गुणासह संयुक्तपणे आघाडीवर आहेत.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In स्पोर्ट्स

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ सोशल मीडियावर सध्या एक वेगळाच चेहरा प्…