no images were found
no images were found
डिजिटल अध्यापनासाठी प्राध्यापकांना विशेष प्रशिक्षण &n…
“देशाच्या जनसांख्यिकीय लाभांशाची पोषकता वाढविण्यासाठी प्रगत अनुदेशन पद्धतीद्वारे कौशल्य निर्मितीची गरज”- प्रा.डॉ.किरणकुमार शर्मा कोल्हापूर(प्रतिनिधी) : शिक्षणशास्त्र अधिविभाग शिवाजी विद्यापीठ ,कोल्हापूर येथे प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियानांतर्गत (पीएम.उषा) “प्रगत अनुदेशन पद्धती’’ या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळेचे दि ३० व ३१ जानेवारी रोजी आयोजन करण्यात आले होते . यावेळी कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर स्कूल ऑफ नॅनोसायन्स अँड टेक्नॉलॉजी विभागाचे प्रभारी संचालक प्रा.डॉ.किरणकुमार शर्मा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.त्यावेळी त्यांनी सद्यस्थितीमध्ये बदलत्या सामाजिक गरजा लक्षात घेऊन शिक्षणपद्धतीमध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता प्रतिपादित केली. याप्रसंगी शिक्षणशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ.चेतना प्र.सोनकांबळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये प्रगत अनुदेशन पद्धतीचे महत्व विशद केले. या दोन दिवसीय कार्यशाळेमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ,पुणे येथील माहिती तंत्रज्ञान विभागाचे संचालक डॉ.नितीन पाटील ,श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ मुंबई येथील डॉ.महेश कोलतामे, शिक्षणशास्त्र विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथील डॉ वैभव जाधव,एमआयटी.एडीटी विद्यापीठ,पुणे येथील डॉ.प्रिया सिंग व प्राणीशास्त्र अधिविभाग शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर येथील प्रा.डॉ .एम.पी.भिलावे यांनी प्रगत अनुदेशन पद्धती या विषयावर तज्ञ म्हणून मार्गदर्शन केले. कार्यशाळेचे समन्वयक डॉ.विद्यानंद खंडागळे यांनी कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी इतिवृत्तांत सादर केला व सहसमन्वयक म्हणून सारिका पाटील यांनी कार्य पाहिले. सूत्रसंचालन बी.एड ,एम.एड (एकात्मिक) प्रशिक्षणार्थी आकांक्षा पाटील व प्रांजली भोंग, किशोर शाम यांनी केले. प्रस्तुत कार्यशाळेसाठी अधिविगातील डॉ.रुपाली संकपाळ,शिक्षक ,संशोधक, विद्यार्थी उपस्थित होते.सदर कार्यशाळेसाठी विविध शैक्षणिक संस्थेमधून ७४ प्रतिसादक उपस्थित होते.
no images were found