no images were found
बालसंकुल येथील मुलांना महिला आघाडी आणि युवती सेनेने बांधल्या राख्या, आणि मुलींना युवासेनेने दिली पर्सची भेट…
कोल्हापूर (प्रतिनिधी): बहिण भावाच्या पवित्र नात्याचा सण अर्थात रक्षाबंधन आज सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. प्रत्येक भाऊ आपल्या बहिणीच्या घरी जाऊन राखी बांधून तिला प्रेमाचं प्रतीक म्हणून भेटवस्तू देत आहे.
आजच्या या पवित्र दिवशी 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण या बंधनीय हिंदुरुदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तत्त्वानुसार आमदार राजेश क्षीरसागर यांच्या सूचनेनुसार युवा सेना कोल्हापूरच्या वतीने बालकल्याण संकुल येथे राखी पौर्णिमा साजरी करण्यात आली.
पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी बाल कल्याण संकुल येथे आज सकाळी भेट दिली. यावेळी महिला पदाधिकारी यांनी येथे उपस्थित मुलांचे औक्षण करून त्यांना राखी बांधली, तसेच त्यांना उदंड आयुष्य लाभावे, आणि आयुष्यात त्यांना यश मिळावे ही सदिच्छा दिली.
यानंतर झालेल्या कार्यक्रमात बालकल्याण संकुल येथील मुलींनी युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना राख्या बांधून त्यांचे औक्षण केले. तर राजनंदिनी कलेक्शनच्या शर्मिलाताई काटकर यांनी स्वतःच्या हाताने तयार केलेल्या पर्स युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना भेट म्हणून देऊन या लाडक्या बहिणींच्या संरक्षणाची आणि त्यांना लागेल ती मदत करण्याची जबाबदारी घेतल्याचे सांगितले.
यावेळी मुलींना वितरीत करण्यात करिता दिवसरात्र मेहनत घेऊन पर्स शिवण्याचे कामं पूर्ण करून ही अनोखी भेट दिल्याबद्दल सौ. शर्मिला काटकर यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी शिवसेना महिला आघाडी कोल्हापूर दक्षिण शहर प्रमुख सौ. अमरजा पाटील, युवा सेना जिल्हा संपर्कप्रमुख प्रसाद चव्हाण, जिल्हा समन्वयक अविनाश कामते, युवासेना उत्तर विधानसभा अध्यक्ष शैलेश साळोखे, युवासेना जिल्हा सरचिटणीस कुणाल शिंदे,युवतीसेना उपशहरप्रमुख वल्लरी वाले,
शिवसेना विभागप्रमुख अवधूत घाटगे,युवासेना शहर सरचिटणीस विपुल भंडारे,उपशहरप्रमुख प्रकाश पाटोळे, शुभम शिंदे, सिद्धेश देसाई,अभिषेक ढेरे, अक्षय पाटील,पिंटू साळोखे, अक्षय घाटगे,अभिषेक मंडलिक,हरी भोसले,भूषण पाटील शिवसेना सोशल मीडिया पश्चिम महाराष्ट्र उपसमन्वयक सौरभ कुलकर्णी आदी उपस्थित होते.