14 second read
0
0
65

no images were found

प्रेक्षकांचे लाडके कलाकार रक्षाबंधन सणाविषयी आणि बहीण-भावाच्या नात्याविषयी सांगत आहेत

 

मुंबई, : रक्षाबंधन म्हणजे केवळ मनगटावर धागा बांधणे नाही. हा हृदयांना जोडणारा सण आहे, सुंदर आठवणी आणि भावंडांमधील अतूट नात्याचा गौरव करणारे हे पर्व आहे. समस्त देश एकत्वाच्या भावनेने आपल्या देशाची ही जुनी परंपरा साजरी करण्यासाठी सज्ज असताना, सोनी सबवरील लोकप्रिय कलाकार- शब्बीर अहलूवालिया, आशी सिंह, आन तिवारी आणि गरिमा परिहार आपल्या लहानपणीच्या आठवणी सांगत आहेत. राखीचा सण खास बनवणारे ते खेळकर क्षण, लुटुपुटीची भांडणे आठवत आहेत. त्यांच्या आठवणींतून या सणातील गोडवा जाणवतो, पडद्यावर ही नाती इतकी सहज कशी साकारता येतात, याचे गमक दिसते.

पुष्पा इम्पॉसिबल मालिकेत दीप्तीची भूमिका करणारी गरिमा परिहार म्हणते, “माझा भाऊ आणि माझ्यात 10 वर्षांचे अंतर असले तरी आमच्या नात्यात प्रगल्भता आणि मस्ती यांचे मस्त संतुलन आहे. प्रत्येक रक्षाबंधन त्या खास नात्याची आठवण करून देते. आम्ही आता मोठे झालो आहोत, पण त्याच्या मनगटावर मी जी राखी बांधते, त्यात आजही तेच प्रेम, संरक्षण आणि लहानपणीच्या सुंदर आठवणी आहेत. तो माझ्यासाठी पित्यासारखा आहे- नेहमी मला मदत करणारा, माझ्या रक्षणाची चिंता करणारा. फक्त माझ्याकडे बघूनच त्याला काहीतरी बिनसले आहे, हे समजते. मी देखील, तो जेव्हा तणावात दिसतो, तेव्हा त्याला खुलवण्यासाठी सगळे प्रयत्न करते. आता तो स्वतः पिता झाला आहे, त्याच्या मुलांकडे बघताना मला गंमत वाटते. त्याचीच छोटी आवृत्ती जणू! ते देखील आमच्या राखी परंपरेत सामील होतात. आम्ही अजूनही एकमेकांच्या खोड्या काढतो, पण सरतेशेवटी, आम्ही ही काळजी घेतो की घरातील वातावरण प्रसन्न राहील. रक्षाबंधन केवळ एक सण नाही. तो माझ्या आयुष्यात असल्याची एक निरंतर, आश्वासक जाणीव देणारा हा सोहळा आहे.”

 ‘उफ्फ ये लव है मुश्किल …’ मालिकेत कैरी शर्मा ही व्यक्तिरेखा साकारणारी आशी सिंह म्हणते, “रक्षाबंधन हा सण माझ्यासाठी फार खास आहे. केवळ मला भाऊ आहे म्हणून नाही, तर मला तीन अद्भुत बहिणी देखील आहेत. आम्ही सगळे एकमेकांना चिडवतो, तयार होतो आणि इतकी भावंडे असल्यामुळे जो काही गोंधळ असतो त्यामुळे आमच्या घराचे रूपांतर सेलिब्रेशन झोनमध्ये होते. आम्हा सगळ्यांमध्ये भाऊ एकटाच आहे. त्यामुळे जितके त्याचे लाड होतात, तितकीच आम्ही त्याच्यावर दादागिरीही करतो. या वर्षी, मी त्याला आधीच सांगितले आहे की, यावेळी मला त्याच्याकडून काहीतरी विशेष भेटवस्तू हवी आहे, अजिबात आनाकानी चालणार नाही! आम्ही चॉकलेट्सपासून ते गुपितांपर्यंत सारे काही शेअर केले आहे. आणि राखी हा असा दिवस असतो, जेव्हा प्रेम (आणि खोड्या) द्विगुणित होते. जीवन कितीही व्यस्त झाले असले, तरी या दिवशी आम्ही सगळे एकत्र येतो आणि हा सहवास फार आनंददायक असतो.”

 ‘उफ्फ ये लव है मुश्किल …’ मालिकेत युगची भूमिका करणारा शब्बीर अहलूवालिया म्हणतो, “रक्षाबंधन हा पहिल्यापासून माझा आवडता सण आहे. हा सण म्हणजे केवळ एक विधी नाही, तर नेहमी एकमेकांसोबत राहण्याचे ते वचन असते. आता मी आणि माझी बहीण शेफाली एका शहरात राहात नाही, पण आमच्यातील नाते अजून तितकेच मजबूत आहे. आम्ही पहिल्यापासून एकमेकांचे चीयरलीडर होतो. आमच्यातील अंतरामुळे यात काहीही फरक पडलेला नाही. या वर्षी, मी विचारपूर्वक तिला असे काहीतरी देणार आहे की जे पाहून तिच्या चेहऱ्यावर हसू उमलेल. ती आहेच या प्रेमासाठी पात्र! राखी पौर्णिमेच्या दिवशी आम्ही एकत्र नसलो, तरी आमच्यात जे प्रेम आणि नाते आहे, ते तिने माझ्या मनगटावर बांधलेल्या राखीच्या पलीकडे जाणारे आहे.”

 वीर हनुमान’ मालिकेत बाल हनुमानाची भूमिका करणारा आन तिवारी म्हणतो, “साची दीदी आणि माझ्या नात्यात भरपूर प्रेम, हसू आणि खूप सारी गुपिते आहेत. मी नशीबवान आहे की ती माझ्या जीवनात आहे. ती माझ्यासाठी दुसऱ्या आईसारखीच आहे, नेहमी मार्गदर्शन देणारी, मला आधार देणारी आणि मी योग्य मार्गावर असल्याची खात्री करणारी. आणि मी? मी तिचा चीयरलीडर आणि संरक्षक आहे- माझ्यासमोर कुणीही तिच्याविषयी काही वावगे बोलू शकत नाही! ती जेव्हा नाराज असते, तेव्हा मी तिला घट्ट मिठी मारतो आणि तिला हसवण्यासाठी शक्य असेल ते करतो. माझ्यासाठी हाच राखीचा अर्थ आहे की, आमच्यातील या अतूट आणि निरपेक्ष नात्याचा आनंद साजरा करणे.”

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

भागीरथी संस्था आणि भाजपच्यावतीने कोल्हापुरातील देवकर पाणंदमध्ये झालेल्या मोफत प्रशिक्षण शिबीराला महिलांचा मोठा प्रतिसाद

भागीरथी संस्था आणि भाजपच्यावतीने कोल्हापुरातील देवकर पाणंदमध्ये झालेल्या मोफत प्रशिक्षण शि…