Home सामाजिक आरटीओ/शासकीय कार्यालयात वाढदिवस साजरे करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करा : -सलमान मौलवी

आरटीओ/शासकीय कार्यालयात वाढदिवस साजरे करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करा : -सलमान मौलवी

39 second read
0
0
52

no images were found

आरटीओ/शासकीय कार्यालयात वाढदिवस साजरे करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करा : -सलमान मौलवी

 

कोल्हापूर (प्रतिनिधी): शासकीय कार्यालयात वाढदिवस साजरे करण्यास बंदी असतानाही कोल्हापूर येथील (आरटीओ) प्रादेशिक परिवहन कार्यालयात कार्यालयीन वेळेत नुकताच दिनांक २४ जुलै २०२५, गुरूवारी या दिवशी मोटार वाहन निरीक्षक संदीप वसंत गडकर या अधिकार्‍याने धुमधडाक्यात वाढदिवस साजरा करून महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९  सह शासन आदेशाचे उल्लंघन केले आहे. म्हणनू त्यांच्यावर आणि त्यांच्या वाढदिवसाला हजेरी लावणार्‍या अधिकारी, कर्मचार्‍यावरही योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केल्याची माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)च्या वाहतूक आघाडी, कोल्हापूर कार्याध्यक्ष सलमान मौलवी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

      वाढदिवसावेळी (विनागणवेशात) बर्थ डे बॉय अर्थात संदीप वसंत गडकर या अधिकार्‍याला शुभेच्छा देण्यासाठी कार्यालयतील अधिकारी/कर्मचारीही गणवेशात हातातील काम बाजूला ठेवून/टाकून उपस्थित होते. मात्र, जिल्ह्यातून आपल्या कामासासाठी आलेले नागरिक ताटकळत हाताश होऊन तासन्तास उभे होते. मात्र, याची कोणत्याही अधिकारी/कर्मचारी यांना दया आली नाही. यातील काही नागरिकांनी आमच्या संघटनेकडे व्यथा मांडल्या. म्हणूनच आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)च्या वाहतूक आघाडीच्या वतीने वाढदिवस साजरे करणार्‍या अधिकारी/कर्मचारी यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, तसेच याची नोंद संबंधित अधिकारी/कर्मचारी यांच्या सेवा पुस्तकात करावी, अशीही मागणी केल्याची माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)च्या वाहतूक आघाडी, कोल्हापूरचे कार्याध्यक्ष सलमान मौलवी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

       यावेळी पत्रकार परिषदेला संबोधित करताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)च्या वाहतूक आघाडी, कोल्हापूर कार्याध्यक्ष सलमान मौलवी म्हणाले की, शासकीय कार्यालयात वाढदिवस साजरे करण्यास शासन निर्णयानुसार बंदी आहे. तरीही काही मुजोर अधिकारी/कर्मचारी या शासन निर्णयाला केराची टोपली दाखवतात. तसेच शासन निर्णयाचं उल्लंघन करताना दिसतात. असे प्रकार आरटीओ कार्यालयात नवीन नाही. याअगोदरही अनेक कार्यालयात असे अधिकारी/कर्मचारी यांचे वाढदिवस साजरे केले जातात. मात्र, अशा अधिकारी-कर्मचार्‍यांना सामान्य नागरिकांचे प्रश्न, काम यांच्याशी काहीही देणंघेणं नाही, असे वागत आहेत, हेच दुर्देव आहे. 

       कोल्हापूर आरटीओ कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक संदीप वसंत गडकर या अधिकार्‍याने वाढदिवस अगदी धुमधडाक्यात साजरा केला. केक आणून तो कार्यालयीन वेळेत कापला. यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आरटीओमधील अधिकारी प्रवीण सातारे, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक शितल कोळी, पूजा साळुंखे, हिनाकौसर सौदागर, यांसह काही कर्मचारी व इतर अशी पूर्ण टीम या वाढदिवसाच्या जल्लोष कार्यक्रमात शासकीय कामकाज बाजूला ठेवून/हातातील काम टाकून जाणीवपूर्वक उपस्थित राहिले होते.

      व्ययक्तीक पातळीवर प्रत्येकाने वाढदिवस साजरा करावा. मात्र, शासकीय अधिकारी-कर्मचारी यांनी शासकीय वेळेत शासकीय काम बाजूला ठेवून असे वाढदिवस साजरे करू नयेत, त्यांनी नागरिकांच्या कामांना, त्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन त्यांची कामे करावीत. यासाठीच त्यांची शासकीय सेवक म्हणून नेमणूक केलेली आहे, याची जाणीव त्यांनी ठेवावी. मात्र, आरटीओ कार्यालयातील आलिकडील प्रकार पाहता अशा अधिकार्‍यांना शासकीय सेवकाचे अधिकार/कर्तव्य याची जाणीव नसल्याचे आढळत आहे. म्हणून आम्ही संघटनेच्यावतीने आरटीओ कार्यालयात वाढदिवस साजरा करणार्‍या अधिकार्‍यासह इतर अधिकारी, कर्मचारी यांच्यावरही महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम 1979 सह शासन आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, तसेच त्यांच्या या कृत्याची नोंद त्यांच्या सेवा पुस्तकालाही करावी, अशी मागणी याव्दारे केली आहे, असेही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) च्या वाहतूक आघाडी, कोल्हापूर कार्याध्यक्ष सलमान मौलवी यांनी सांगितले. याबद्दलचे निवेदन प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय भोर यांना देण्यात आले आहे. त्यांनी कारवाई करण्याची ग्वाही दिली आहे.

     या पत्रकार परिषदेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)च्या वाहतूक आघाडी, कोल्हापूर संघटनेचे जिल्हा सचिव सतीश माळगे, राज्य सचिव संघटक प्राध्यापक शहाजी कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष संजय जिरगे,राधानगरी तालुकाध्यक्ष कुंडलिक कांबळे, प्रवीण आजरेकर, रशीद मुजावर, अनिल नलवडे, समद सय्यद आदी उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

विद्यापीठात ‘जीएसटी’च्या अनुषंगाने २३ मार्चपासून राष्ट्रीय चर्चासत्र

विद्यापीठात ‘जीएसटी’च्या अनुषंगाने २३ मार्चपासून राष्ट्रीय चर्चासत्र कोल्हापूर,(प्रति…