Home शैक्षणिक विदेशी भाषा प्रवेशासाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ

विदेशी भाषा प्रवेशासाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ

13 second read
0
0
241

no images were found

विदेशी भाषा प्रवेशासाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ

 

कोल्हापूर, (प्रतिनिधी) : सन २०२५-२०२६ या शैक्षणिक वर्षासाठी शिवाजी विद्यापीठातील विदेशी भाषा विभागातर्फे घेण्यात येणाऱ्या रशियन, जर्मन, जपानी व पोर्तुगीज भाषा प्रमाणपत्र अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अर्ज भरण्याची मुदत दि. ३१/०७/२०२५ पर्यंत वाढविण्यात आली आहे.

शिवाजी विद्यापीठातील विदेशी भाषा विभागातर्फे एक वर्ष कालावधीचे रशियन, जर्मन, जपानी व  पोर्तुगीज भाषा प्रमाणपत्र अभ्यासक्रम घेण्यात येतात. या अभ्यासक्रमांची प्रवेश क्षमता प्रत्येकी ५० इतकी आहे. यासाठी १२ वी उत्तीर्ण अशी प्रवेश अर्हता आहे. दररोज सायंकाळी एक तास याप्रमाणे वर्ग असतात. इतर अभ्यासक्रम व नोकरी करतही भाषा अभ्यासक्रम करता येतो. तसेच हे अभ्यासक्रम करून आंतरराष्ट्रीय स्तरावरील भाषा प्राविण्य परीक्षाही  देता येतात. विदेशी भाषा अवगत असणाऱ्या विद्यार्थी-युवकांसाठी उद्योग, सेवा क्षेत्र, बिझनेस, पर्यटन, हॉटेल व्यवसाय, निर्यात क्षेत्र, सांस्कृतिक आदानप्रदान  अशा विविध क्षेत्रांत अनेक प्रकारच्या करिअर संधी उपलब्ध आहेत.  प्रवेशासंबंधी अधिक माहितीसाठी विदेशी भाषा विभाग कार्यालय, वि.स. खांडेकर भाषा भवन, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे संपर्क साधावा, असे आवाहन अधिविभाग प्रमुख डॉ. मेघा पानसरे यांनी केले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

आमदार अमल महाडिक यांचा हरित कोल्हा

आमदार अमल महाडिक यांचा हरित कोल्हापूरचा संकल्प; शहरात लावणार दहा हजार झाडे कोल्हापूर, (प्र…