no images were found
कलाकारांनी जिममध्ये फिटनेस राखण्याच्या त्यांच्या पद्धतींबाबत सांगितले!
अनेकजण फिटनेससाठी जिममध्ये व्यायाम करायला जातात, जो शारीरिक फायदे देण्यासोबत तणाव दूर करण्याचा आणि मन प्रसन्न करण्याचा उत्तम मार्ग देखील आहे. वजन उचलायचे असो, ट्रेडमिलवर धावणे असो किंवा सर्किट प्रशिक्षण घ्यायचे असो जिम अनेक कलाकारांसाठी उत्साहित होण्याची वैयक्तिक जागा बनली आहे. एण्ड टीव्ही कलाकार पारस अरोरा (जीतू, ‘घरवाली पेडवाली’), सोनल पनवार (मलायका, ‘हप्पू की उलटन पलटन’) आणि विदिशा श्रीवास्तव (अनिता भाबी, ‘भाबीजी घर पर है’) जिममध्ये नियमितपणे व्यायाम केल्याने शारीरिकदृष्ट्या तंदुरूस्त आणि मन प्रसन्न ठेवण्यास कशाप्रकारे मदत होते, याबाबत सांगत आहेत. आगामी मालिका ‘घरवाली पेडवाली’मध्ये जीतूची भूमिका साकारताना पाहायला मिळणारा पारस अरोरा म्हणाला, ”माझ्यासाठी जिम म्हणजे थेरपी आहे. जिममध्ये मी सर्वकाही विसरून जातो आणि फक्त व्यायामावर लक्ष केंद्रित करतो. मला ताकद वाढवणारा व्यायाम आवडतो, वजन उचलताना वेगळा अनुभव मिळतो, ज्यामुळे मला आतून सक्षम असल्यासारखे वाटते. माझे आवडते व्यायाम आहेत कंपाऊंड लिफ्ट्स, डेडलिफ्ट्स, क्वॉट्स आणि बेंच प्रेस. या व्यायामामधून स्नायू मजबूत होतात आणि ऊर्जा मिळते. व्यायाम सुरू करण्यापूर्वी मी कानामध्ये हेडफोन लावतो आणि उत्साहवर्धक गाणी ऐकतो, ज्यामध्ये सामान्यत: बॉलिवुड गाणी व क्लासिक रॉक गाण्यांचा समावेश असतो. यामुळे व्यायाम करायला अधिक ऊर्जा मिळते. मी जिमला जाण्यापूर्वी जास्त खात नाही, कधी-कधी ऊर्जा कमी असल्यासारखे वाटल्यास एक केळं खातो. व्यायाम केल्यानंतर मी हायड्रेटेड राहण्याची खात्री घेतो आणि काही मिनिटे स्ट्रेचिंग करतो. यामुळे मला दिवसभर उत्साहित राहण्यास मदत होते.”
मालिका ‘हप्पू की उलटन पलटन’मधील सोनल पनवार ऊर्फ मलायका म्हणाल्या, ”जिम माझ्यासाठी तणाव दूर करण्यासारखे आहे. कितीही व्यस्त दिवस असला तरी व्यायाम केल्याने माझा सर्व तणाव दूर होतो. मला सर्वाधिक सर्किट प्रशिक्षण घ्यायला आवडते. यामध्ये कार्डियो व वजन उलचणे यांचा समावेश आहे, जे कधीच कंटाळवाणे वाटत नाही आणि माझा मूड उत्साहित करते. माझा फिटनेस मंत्र म्हणजे संतुलन व आनंद राखणे. जिमममध्ये जाण्यापूर्वी मी काही मिनिटे मेडिटेशन करते, तणाव दूर करत मानसिकदृष्ट्या सुसज्ज राहण्यासाठी दीर्घ श्वास घेते. ही माझी रोजची सवय बनली आहे आणि अद्भुतरित्या कामी आली आहे. मी व्यायाम करायला जाण्यापूर्वी खाणे टाळते, लिंबाचा रस असलेले कोमट पाणी पिते. संगीत माझ्या नित्यक्रमाचा भाग बनले आहे. मला पंजाबी गाणी खूप आवडतात. व्यायाम केल्यानंतर मला शारीरिकदृष्ट्या व मानसिकदृष्ट्या प्रसन्न वाटते. फक्त तंदुरूस्त दिसणे नाही तर त्वचा देखील कोमल राहणे महत्त्वाचे आहे.” मालिका ‘भाबीजी घर पर है’मध्ये अनिता भाबीची भूमिका साकारणाऱ्या विदिशा श्रीवास्तव म्हणाल्या, ”मला पिलेट्स व योगा करायला आवडते, तसेच विशेषत: ऊर्जेची गरज असताना जिममध्ये जायला देखील आवडते. जिमममधील माझा आवता व्यायाम आहे पिलेट्स-बेस्ड ताकदीचा व्यायाम, ज्यामध्ये ताकद वाढवण्यासाठी आणि पवित्रा सुधारण्यासाठी रेसिस्टण्स मशिन्स किंवा फ्री वेट्सचा वापर केला जातो. मला यामध्ये सामावून जाण्यास मदत करणारी गोष्ट म्हणजे शांतता. व्यायाम करण्यापूर्वी मी पाच मिनिटे शांत बसते, स्क्रिन पाहत नाही, कोणताही आवाज नसतो. यामुळे मला व्यायामावर अधिक लक्ष केंद्रित करता येते. मी व्यायाम करण्यापूर्वी काहीच खात नाही, फक्त नारळाचे पाणी पित स्वत:ला हायड्रेटेड ठेवते. मी प्रसन्न इन्स्ट्रूमेण्टल गाणी ऐकत वॉर्मअप करते आणि त्यानंतर उत्साहवर्धक गाणी ऐकत व्यायाम करते. मी खूपच जास्त व्यायाम करत नाही तर आतून तंदुरूस्त व छान वाटेल इतकाच व्यायाम करते.”