no images were found
टोयोटा किर्लोस्कर मोटरने ग्लांझा मध्ये सहा एअरबॅगसह “प्रेस्टीज एडिशन” अॅक्सेसरी पॅकेज सादर केले
- आता सर्व मॉडेल्समध्ये सहा एअरबॅग्स मिळणार, त्यामुळे सुरक्षितता अधिक वाढणार
- नवीन ‘प्रेस्टीज पॅकेज’मुळे ग्राहकांना अधिक फायदा आणि मूल्य मिळणार
टोयोटा किर्लोस्कर मोटर (टीकेएम) ने आज आपल्या लोकप्रिय हॅचबॅक टोयोटा ग्लांझा मध्ये दोन महत्त्वपूर्ण अपडेट जाहीर केले आहेत. यामागचा उद्देश म्हणजे वाहनाची सुरक्षितता अधिक वाढवणे आणि ग्राहकांना अधिक मूल्य देणे आहे.
सुरक्षिततेस प्राधान्य: सर्व व्हेरिएंटमध्ये सहा एअरबॅग्स आता मानक
सुरक्षिततेबाबत आपली वचनबद्धता अधोरेखित करत, टोयोटा ग्लांझा च्या सर्व व्हेरिएंटमध्ये आता सहा एअरबॅग्स मानक (स्टँडर्ड) म्हणून दिल्या जातील, जे चालक आणि प्रवाशांसाठी अधिक सुरक्षितता देतील. त्याच्या प्रीमियम डिझाईन, प्रगत टेक्नॉलॉजी आणि विश्वासार्ह परफॉर्मन्समुळे ग्लांझा ही कार प्रथमच कार खरेदी करणाऱ्या ग्राहकांमध्ये, तरुण प्रोफेशनल्स आणि शहरी भागातील लोकांमध्ये खूपच लोकप्रिय ठरली आहे. स्टायलिश डिझाइन, इंधन कार्यक्षमता आणि त्रासमुक्त मालकीच्या अनुभवामुळे लोकप्रिय ठरलेली ही ग्लांझा, आता सहा एअरबॅग्ससह अधिक सुरक्षित आणि आकर्षक ठरणार आहे. यामुळे प्रत्येक ग्राहकाला अधिक आत्मविश्वास आणि मानसिक शांती मिळेल.
नवीन ‘प्रेस्टीज पॅकेज’सह अतिरिक्त मूल्य
ग्राहकांचा मालकीचा अनुभव अधिक समृद्ध करण्यासाठी टोयोटा किर्लोस्कर मोटरने एक मर्यादित कालावधीसाठी ‘प्रेस्टीज पॅकेज’ सादर केले आहे. हे एक विचारपूर्वक तयार केलेले अॅलक्सेसरी पॅकेज आहे, जे ग्लांझा ची स्टाईल, आराम आणि दैनंदिन उपयुक्तता वाढवते. हे पॅकेज 20 जून ते 31 जुलै 2025 या कालावधीत उपलब्ध आहे आणि यात डीलरद्वारे बसविलेल्या खालील अॅक्सेसरींचा समावेश आहे:
- प्रीमियम डोअर व्हायझर
- क्रोम आणि काळ्या अॅक्सेंटसह बॉडी साइड मोल्डिंग
- रिअर लॅम्प गार्निश
- ओआरव्हीएम व फेंडरसाठी क्रोम गार्निश
- रिअर स्किड प्लेट
- प्रकाशित (इल्युमिनेटेड) डोअर सिल्स
- लोअर ग्रिल गार्निश
टोयोटा ग्लांझा – स्मार्ट मोबिलिटी, दैनंदिन वापरासाठी उपयुक्त
भारतामध्ये दोन लाखांहून अधिक युनिट्सची विक्री आणि सहा वर्षांचा यशस्वी प्रवास साजरा करत, टोयोटा ग्लांझा ही भारतीय कुटुंबांची लोकप्रिय पर्याय बनली आहे. ही कार आकर्षक डिझाइन, इंधन कार्यक्षमता, प्रगत फीचर्स आणि टोयोटाच्या विश्वासार्हतेचे उत्तम मिश्रण आहे. 1.2-लिटर के-सिरीज पेट्रोल इंजिन असलेल्या ग्लांझा कार चे मायलेज 22.94 किमी/लि (एएमटी) आणि 30.61 किमी/किग्रॅ (सीएनजी) र्यंत आहे. ग्लांझा मध्ये 9-इंच इन्फोटेनमेंट सिस्टम, हेड-अप डिस्प्ले (एचयूडी), 360-डिग्री कॅमेरा आणि 45 हून अधिक कनेक्टेड फीचर्ससह टोयोटा आय-कनेक्ट अशा सेगमेंट-अग्रगण्य सुविधा आहेत.
आजच्या शहरी जीवनशैलीसाठी तयार केलेली ही कार आकर्षक लूकसाठी ओळखली जाते. यामध्ये टोयोटाची खास ग्रिल, एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प्स, 16-इंच अलॉय व्हील्स आणि स्पोर्टिंग रेड, इंस्टा ब्लू, एनटायसिंग सिल्व्हर, गेमिंग ग्रे आणि कॅफे व्हाइट यांसारखे आकर्षक रंग उपलब्ध आहेत. कारच्या प्रीमियम ड्युअल-टोन इंटिरियरमध्ये प्रशस्त जागा, रिअर एसी व्हेंट, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आणि आरामदायक ड्रायव्हिंगसाठी टिल्ट आणि टेलिस्कोपिक स्टीअरिंग दिलेले आहे. सहा एअरबॅग्स, व्हेईकल स्टॅबिलिटी कंट्रोल (व्हीएससी), हिल होल्ड असिस्ट आणि मजबूत टीईसीटी बॉडी स्ट्रक्चरसारख्या फीचर्समुळे ही कार सुरक्षित आणि आत्मविश्वासपूर्ण ड्रायव्हिंगचा अनुभव देते.
संपूर्ण समाधानासाठी सेवा आणि वॉरंटी
टोयोटा ग्लांझा ही कार फक्त उत्तम परफॉर्मन्ससाठी नाही, तर ग्राहकांना मानसिक शांती मिळावी म्हणूनही डिझाइन करण्यात आली आहे. ती 3 वर्षे / 1,00,000 किमी वारंटीसोबत येते, जी 5 वर्षे / 2,20,000 किमीपर्यंत वाढवता येते. त्यामुळे ग्राहकांना निश्चिंत आणि सुखद मालकीचा अनुभव मिळतो. टोयोटाची खास 60 मिनिटांची एक्सप्रेस मेंटेनन्स सर्व्हिस, 24 तास रस्त्यावर मदत मिळण्याची सुविधा (रोडसाइड असिस्टन्स )आणि लवचिक व ग्राहकांसाठी सोपे फायनान्स पर्याय ग्लांझा ला एक परिपूर्ण पर्याय बनवतात.
टोयोटा ग्लांझा ची सुरुवातीची किंमत 6.90 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. ग्राहक त्यांच्या जवळच्या टोयोटा डीलरशिपला भेट देऊ शकतात किंवा https://www.toyotabharat.com/# या वेबसाईटवर ऑनलाइन बुकिंग करू शकतात