Home राजकीय स्वर्गीय सुभाष वोरा मोफत अभ्यासिकेमुळं देशाला उत्कृष्ट दर्जाचे प्रशासकीय अधिकारी मिळतील : चंद्रकांतदादा पाटील 

स्वर्गीय सुभाष वोरा मोफत अभ्यासिकेमुळं देशाला उत्कृष्ट दर्जाचे प्रशासकीय अधिकारी मिळतील : चंद्रकांतदादा पाटील 

26 second read
0
0
41

no images were found

स्वर्गीय सुभाष वोरा मोफत अभ्यासिकेमुळं देशाला उत्कृष्ट दर्जाचे प्रशासकीय अधिकारी मिळतील : चंद्रकांतदादा पाटील 

 

कोल्हापूर (प्रतिनिधी): विद्या प्रबोधिनीच्या माध्यमातून सुरु केलेल्या स्वर्गीय सुभाष वोरा मोफत अभ्यासिकेमुळं देशाला उत्कृष्ट दर्जाचे प्रशासकीय अधिकारी मिळतील, असा विश्वास उच्च तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज व्यक्त केला. स्वर्गीय सुभाष वोरा मोफत अभ्यासिकेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

      राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनसंघ आणि भारतीय जनता पक्ष अशी दमदार राजकीय आणि सामाजिक वाटचाल करणारे माजी नगरसेवक स्वर्गीय सुभाष वोरा यांच्या नावे मोफत अभ्यासिका सुरु करण्यात आलीय. विद्या प्रबोधिनीच्या माध्यमातून चालवण्यात येणारी ही अभ्यासिका नामदार चंद्रकांत पाटील यांची संकल्पना आहे. स्पर्धा परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांसाठी ही अभ्यासिका सुरु करण्यात आली असून, त्यामध्ये ३४ उमेदवार अभ्यास करु शकतील, अशी सर्व सुविधा त्यांना लागणार्‍या स्पर्धा परीक्षा पुस्तकांसह उपलब्ध करुन देण्यात आलीय. 

      बिंदू चौक येथील येथील जुन्या भाजपा कार्यालयाच्या इमारतीमध्ये सुरू झालेल्या या अभ्यासिकेचं उद्घाटन आज नामदार पाटील यांच्या हस्ते आणि खासदार धनंजय महाडिक, प्रफुल जोशी, विजय जाधव, महेश जाधव, राहूल चिकोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालं. 

       यावेळी बोलताना नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी स्वर्गीय वोरा यांच्या सामाजिक, राजकीय वाटचालीचा आढावा घेतला. संघ परिवारात वाढलेल्या वोरा यांच्याकडं पराकोटीची निष्ठा होती. त्यांनी कधीही तत्वाशी तडजोड केली नाही. राजकीय, सामाजिक क्षेत्रात येऊ पाहणार्‍या नव्या पिढीला वोरा यांचं कार्य नेहमीच प्रेरणादायी व्हावं, यासाठीच ही अभ्यासिका सुरु करण्यात आलीय. त्यातून देशाला चांगले प्रशासकीय अधिकारी मिळतील, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला. खासदार धनंजय महाडिक यांनीही सन २००४ मध्ये आपण जेव्हा लोकसभेची पहिली निवडणूक लढवली त्यावेळी वोरा यांच्या कार्यपध्दतीची तसंच पक्ष निष्ठेची ओळख झाली. ते प्रत्येक पिढीला प्रेरणादायी ठरणारं व्यक्तीमत्व होतं. त्यांच्या आठवणी आणि कार्य चिरंतन राहील, असं खासदार महाडिक यांनी नमूद केलं.प्रदेश सचिव महेश जाधव यांनी पक्ष शिस्त आणि कार्यकर्त्यांना घडवण्याचे काम वोरा साहेबांच्या माध्यमातून झाल्याचे नमूद करत याची उदाहरणे दिली.

       यावेळी प्रफुल्ल जोशी, महेश जाधव, मिश्रीलाल जाजू, उदय सांगवडेकर यांचीही भाषणं झाली. कार्यक्रमाला वोरा यांच्या भगिनी आशा वोरा, महेश जाधव, विजय जाधव,राहुल चिकोडे, प्रा.जयंत पाटील, हेमंत आराध्ये, संगीता खाडे, विराज चिखलीकर, अमर साठे, संपतराव पवार, मिश्रीलाल जाजु, राजाराम शिपूगडे, दिलीप मैत्राणी, समीर नदाफ, अ‍ॅड.संगीता तांबे त्याचबरोबर विद्या प्रबोधिनीचे राजकुमार पाटील नितीन कामत अमित लवटे वृंदा सलगर शिवाली निंबाळकर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

भागीरथी संस्था आणि भाजपच्यावतीने कोल्हापुरातील देवकर पाणंदमध्ये झालेल्या मोफत प्रशिक्षण शिबीराला महिलांचा मोठा प्रतिसाद

भागीरथी संस्था आणि भाजपच्यावतीने कोल्हापुरातील देवकर पाणंदमध्ये झालेल्या मोफत प्रशिक्षण शि…