Home आरोग्य घटत्या जन्मदरासंदर्भात शिवाजी विद्यापीठ व वैद्यकीय तज्ज्ञांचा अभ्यास गट कुलगुरू शिर्के – वंध्यत्वावरील परिषदेचा समारोप

घटत्या जन्मदरासंदर्भात शिवाजी विद्यापीठ व वैद्यकीय तज्ज्ञांचा अभ्यास गट कुलगुरू शिर्के – वंध्यत्वावरील परिषदेचा समारोप

26 second read
0
0
66

no images were found

 

घटत्या जन्मदरासंदर्भात शिवाजी विद्यापीठ व वैद्यकीय तज्ज्ञांचा अभ्यास गट कुलगुरू शिर्के – वंध्यत्वावरील परिषदेचा समारोप

कोल्हापूर, (प्रतिनिधी):– घटत्या जन्मदरासंदर्भात शिवाजी विद्यापीठ व वैद्यकीय तज्ज्ञ समितीच्या माध्यमातून संशोधन करता येईल, अशी अपेक्षा कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी व्यक्त केली. 

       वंध्यत्व हा एक गंभीर आणि वाढता आरोग्यविषयक प्रश्न असून, यावर योग्य निदान व उपचाराची गरज दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर इसार  (इंडियन सोसायटी ऑफ असिस्टेड रिप्रॉडक्शन) राज्य शाखा यांच्या अध्यक्षतेखाली आणि कोल्हापूर ऑब्स्टेट्रिक्स अ‍ॅण्ड गायनेकॉलॉजी सोसायटी यांच्या सहभागाने हॉटेल सयाजी येथे १२ व १३ जुलै २०२५ रोजी वंध्यत्वविषयक दोनदिवसीय शास्त्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती. परिषदेचे उद्घाटन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू  डॉ. डी. टी. शिर्के  यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर किरण कुर्तकोटी म्हणून उपस्थित होते.

       कमी होत असलेल्या प्रजनन दरासंदर्भात चिंता व्यक्त करून कुलगुरूंनी जागतिक स्तरावरील संख्याशास्त्रातील संदर्भ दिले. या कमी होणाऱ्या जन्म दरासंदर्भात शंका व्यक्त केली. ते म्हणाले, भविष्यामध्ये शिवाजी विद्यापीठ व वैद्यकीय तज्ज्ञ यांच्यामध्ये एक अभ्यास गट तयार करून विविध अडचणींवर संशोधन करता येईल. त्यासाठी विद्यापीठाकडून मदतीचा हात पुढे करीत आहे तर डॉक्टरांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा. 

महाराष्ट्र चाप्टर ऑफ ईसारच्या  अध्यक्षा डॉ. पद्म रेखा जिरगे यांनी प्रास्ताविकामध्ये आपल्या कार्यकालामध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमांचा आढावा घेतला. त्या म्हणाल्या, सर्व परिषदा तसेच नवीन गर्भ तज्ज्ञ निर्माण करण्याचा अभ्यासक्रम व आयव्हीएफ  क्लिनिकमधील नर्सेसना स्पेशल ट्रेनिंगची व्यवस्था केली होती. तो कार्यक्रम छान झाला. 

डॉ. पद्म रेखा जिरगे यांनी दोन वर्षांचा कालावधी पूर्ण केल्यानंतर पुढील दोन वर्षांसाठी डॉक्टर अमित पत्की यांना पदभार दिला आहे. पुढील कालावधीसाठी डॉ. जिरगे यांनी चालू केलेले गर्भ निर्माण तज्ज्ञ व नर्सेस यांचा ट्रेनिंग प्रोग्राम असाच पुढे चालू ठेवण्याचे आश्वासन डॉ. पत्की यांनी यावेळी दिले. प्रमुख पाहुणे डॉ. किरण कुर्तकोटी यांनीही मार्गदर्शन केले. 

      दोन दिवस चाललेल्या या परिषदेमध्ये स्त्री-पुरुष वंध्यत्व, हार्मोन्स असंतुलन,  आधुनिक उपचार पद्धती  जनुकीय चाचण्या आणि नवीनतम तंत्रज्ञान यांसारख्या वंध्यत्वाच्या सर्व पैलूंवर सखोल चर्चा झाली. नवीन वैज्ञानिक उपचार पद्धती, कमीत कमी औषधाचा उपयोग करून करण्यात येत असलेली उपचार पद्धती, राज्यभरातील आणि देशपातळीवरील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ,  Embryologist युरोलॉजिस्ट, अँड्रोलॉजिस्ट आणि या क्षेत्रातील अग्रणी संशोधक यांनी परिषदेत  मार्गदर्शन केले. यावेळी झालेल्या चर्चासदांमधून टेस्ट ट्यूब बेबीसारख्या आधुनिक आणि उपचार पद्धती, त्यातील नवीन संशोधन याचे सादरीकरण झाले. यामध्ये डॉ. जयदीप टंक 

डॉ. नंदिता पालशेतकर, डॉ. अमित पत्की, डॉ. केदार गणला, डॉ. तानाजी पाटील, डॉ. रणजित किल्लेदार, डॉ. साधना पटवर्धन, डॉ. चैतन्य शेंबेकर, डॉ. सतीश पत्की, डॉ. मिलिंद पिशवीकर आणि डॉ. प्रवीण हेन्द्रे हे सर्व परिषदेमध्ये सहभागी झाले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In आरोग्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राची पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राची पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सु…