Home Uncategorized पंचवार्षिक बृहतआराखड्यातील शिल्लक बिंदूंसाठी १५ जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

पंचवार्षिक बृहतआराखड्यातील शिल्लक बिंदूंसाठी १५ जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

13 second read
0
0
41

no images were found

पंचवार्षिक बृहतआराखड्यातील शिल्लक बिंदूंसाठी १५ जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

कोल्हापूर(प्रतिनिधी) : शैक्षणिक वर्ष 2024-25 ते 2028-29 हा पंचवार्षिक बृहत आराखडा शासनास पाठविलेला आहे. त्याला शासनाची मान्यता मिळाली असून शासनाच्या धोरणानुसार प्रतिवर्षाचा वार्षिक बृहत आराखडा हा पंचवार्षिक बृहत आराखड्यातील बिंदू घेवून बनविला जातो.

      सन 2026-27 चा वार्षिक बृहत आराखडा सध्या तयार केलेला आहे. व तो विद्यापीठाच्या www.unishivaji.ac.in या संकेतस्थळावर Affiliation/ Affiliation T-2 Information/ List या लिंकवर ठेवण्यात आलेला आहे. त्यामध्ये सन 2026-27 साठीचे शासनास शहर व तालुका निहाय अभ्यासक्रमानुसार बिंदू दर्शविण्यात आलेले आहेत. तसेच सध्या संबंधित शहर व तालुक्यामध्ये कोणती महाविद्यालये आहेत आणि त्यामध्ये कोणते अभ्यासक्रम सुरु आहेत, यांची माहिती दिलेली आहे. त्याच बरोबर पंचवार्षिक बृहत आराखड्यामध्ये शिल्लक बिंदू त्या तक्त्यामध्ये नमूद केलेले आहेत. जर आपणास शिल्लक बिंदूमधून नियमानुसार एखादा बिंदू घ्यावयाचा असल्यास आपण मा.कुलसचिव, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या नावे अर्ज करु शकता. सदर अर्ज हे तातडीने करावे, असे आवाहन शिवाजी विद्यापीठ प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. तेव्हा सदरचे अर्ज दिनांक 15/07/2025 पर्यंत विद्यापीठ कार्यालयास (संलग्नता टी – 2 विभागास) देण्यात यावे. विलंबाने प्राप्त होणाऱ्या अर्जांवर कार्यवाही केली जाणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी, असे उपकुलसचिव डॉ. प्रमोद पांडव यांनी कळविले आहे.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ सोशल मीडियावर सध्या एक वेगळाच चेहरा प्…