Home शैक्षणिक एनआयटीला अतिउत्कृष्ट श्रेणी एमएसबीटीईच्या शैक्षणिक तपासणीतील कामगिरी

एनआयटीला अतिउत्कृष्ट श्रेणी एमएसबीटीईच्या शैक्षणिक तपासणीतील कामगिरी

2 second read
0
0
106

no images were found

 

एनआयटीला अतिउत्कृष्ट श्रेणी एमएसबीटीईच्या शैक्षणिक तपासणीतील कामगिरी

कोल्हापूर (प्रतिनिधी):श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूर संचलित उचगांव येथील न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजीच्या मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स-कम्प्युटर आणि एआयएमएल या डिप्लोमा कोर्सेसना महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाकडून झालेल्या शैक्षणिक तपासणीत अतिउत्कृष्ट श्रेणी प्राप्त झाली. ऑटोमोबाईल, सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल या इतर तीन डिप्लोमा कोर्सेसना एनबीएकडून मानांकन प्राप्त असलेने सदरची शैक्षणिक तपासणी लागू नाही. येथील शिक्षण पद्धती, स्टार्टअप निर्मितीसाठीचे उपक्रम, नाविन्यपूर्ण प्रोजेक्ट्स, औद्योगिक अभ्यास भेटी, अद्ययावत लॅब व वर्कशॉप, डिजिटल ग्रंथालय, विद्यार्थ्यांचा निकाल व अभिप्राय यावर मुल्यांकनात भर देत तपासणी समितीने या विभागांना उच्चतम अशी अतिउत्कृष्ट श्रेणी दिली आहे असे संचालक डाॅ. संजय दाभोळे यांनी सांगितले. सद्ध्या डिप्लोमा व डिग्री इंजिनिअरिंगच्या प्रवेश प्रक्रिया सुरू असून विद्यार्थी-पालकांनी एनआयटीमधील शासनमान्य प्रवेश सुविधा केंद्रात येवून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहन अधिष्ठाता प्रा. बाजीराव राजिगरे यांनी केले आहे. संस्थेचे अध्यक्ष बी. जी. बोराडे, चेअरमन डाॅ. के. जी. पाटील, व्हाईस चेअरमन डी. जी. किल्लेदार व सर्व संचालक यांनी सर्व स्टाफचे अभिनंदन केले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ ता…