no images were found
न्यू कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांचे बोर्ड परिक्षेत यश
कोल्हापूर (प्रतिनिधी):श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचालित न्यू कॉलेज ऑफ फार्मसी उचंगाव मधील विद्यार्थ्यानी गुणवत्ता पूर्वक निकालाची परंपरा राखत घवघवीत यश संपादन केले .
महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळा तर्फे उन्हाळी परीक्षा २०२५ चा निकाल जाहीर झाला असून विद्यार्थ्यानी यश संपादन केले. यामध्ये प्रथम वर्षातील विद्यार्थी प्रथम क्रमांक कु . वैष्णवी विजय घोसळकर (७५.१० %) , द्वितीय क्रमांक कु. वृशाली गंभीर मगदुम (७०.६०%), व तृतीय क्रमांक कु. स्वरांजली दत्तात्रय भोसले ( ७०.३० %) यांनी अनुक्रमे यश संपादन केले.
द्वितीय वर्षातील प्रथम क्रमांक कु. सायली शिवाजी पाटील (७९.०९%), द्वितीय क्रमांक कु. पूजा संजय धुमाळे व ओंकार दिगंबर जंगम (७४.७३%) व व तृतीय क्रमांक प्रविणकुमार दिनकरराव देसाई (७१.९१%) यासाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले .
संस्थेचे अध्यक्ष बोराडे सर , चेअरमन डॉ . के . जी . पाटील सर , वाइस चेअरमन श्री. किल्लेदार सर व सर्व संचालकानी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या .