Home शैक्षणिक ‘एनआयटी’ च्या विद्यार्थ्यांचे तंत्रशिक्षण बोर्डाच्या परीक्षेत धवल यश

‘एनआयटी’ च्या विद्यार्थ्यांचे तंत्रशिक्षण बोर्डाच्या परीक्षेत धवल यश

1 second read
0
1
105

no images were found

‘एनआयटी’ च्या विद्यार्थ्यांचे तंत्रशिक्षण बोर्डाच्या परीक्षेत धवल यश

 

कोल्हापूर (प्रतिनिधी):श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूर संचलित उचगांव येथील न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजीच्या (एनआयटी) विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या उन्हाळी २०२५ परीक्षेत धवल यश प्राप्त केले. अंतिम वर्ष परीक्षेत मोनिका सावंत (एआयएमएल) ९७.१%, सिद्धांत साळोखे (इलेक्ट्राॅनिक्स) ९५.५%, सिद्धेश चौगुले (मेकॅनिकल) ९३.१% सुहानी देसाई (इलेक्ट्रीकल) ९२.८%, अनिस शेख (सिव्हिल) ९२% व वरूण पाडळकर (ऑटोमोबाईल) ९०% हे विद्यार्थी आपापल्या विभागात अव्वल ठरले. त्यांच्यासह तब्बल ५१ विद्यार्थ्यांनी ९०% पेक्षा जास्त गुण मिळवून देदीप्यमान यश प्राप्त केले. 

त्याचबरोबर २७ विद्यार्थ्यांनी विविध विषयांत १०० पैकी १०० गुण मिळवून ते बोर्डात अव्वल ठरले. सर्वसामान्य कुटुंबातील मुलामुलींचे हे नेत्रदीपक यश विद्यार्थी व स्टाफ यांच्या कष्टाची पावती आहे अशा शब्दांत चेअरमन डाॅ. के. जी. पाटील यांनी यशस्वी विद्यार्थी व स्टाफचे अभिनंदन केले. यशस्वी विद्यार्थ्यांप्रती अभिमान व्यक्त करत एनआयटीमधील डिप्लोमा व डिग्री इंजिनिअरिंग कोर्सेसचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे व्हाईस चेअरमन डी. जी. किल्लेदार म्हणाले. तंत्रशिक्षणात अग्रेसर असलेले एनआयटी हे विद्यार्थ्यांचा उच्च शैक्षणिक दर्जा आणि सर्वांगीण विकास यासाठी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन एनआयटीचे संचालक डाॅ. संजय दाभोळे यांनी केले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

डिजिटल अध्यापनासाठी प्राध्यापकांना विशेष प्रशिक्षण

डिजिटल अध्यापनासाठी प्राध्यापकांना विशेष प्रशिक्षण        &n…