Home उद्योग डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजमध्ये शनिवारी ‘डायबेटिक फूट’वर  परिषद

डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजमध्ये शनिवारी ‘डायबेटिक फूट’वर  परिषद

25 second read
0
0
37

no images were found

डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजमध्ये शनिवारी ‘डायबेटिक फूट’वर  परिषद

 

कोल्हापूर (प्रतिनिधी):डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजच्यावतीने शनिवार दि. २१ जून २०२५ रोजी ‘डायबेटिक फूट’वर एकदिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. डायबेटिक फूट सोसायटी ऑफ इंडीया (DFSI) यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या चर्चासत्रात नामवंत डॉक्टर्स मार्गदर्शन करणार आहेत.

       भारतामध्ये  मधुमेहाचे प्रमाण वाढत असून त्यामुळे डायबेटिक फूटच्या जखमा, गँगरीन, अपंगत्वच्या समस्या वाढत आहेत.  या सामाजिक व वैद्यकीय प्रश्नाला उत्तर शोधण्यासाठी व कोल्हापूर परिसरातील वैद्यकीय व्यावसायिकांसोबत याबाबतचे अद्ययावत  ज्ञान शेअर करण्यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. 

       डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजच्या  सर्जरी, मेडिसिन, अस्थिरोग आणि अनाटॉमी या विभागांनी एकत्र येऊन डायबेटिक फूट सोसायटी ऑफ इंडीया (DFSI) यांच्या संयुक्त विद्यमाने या परिषदेचे आयोजन केले आहे. या परिषदेमध्ये मुंबई येथील ख्यातनाम डॉ. अरुण बाळ, डॉ. संजय वैद्य, डॉ. मिलिंद रूके, डॉ. शैलेश रानडे तसेच हैद्राबाद येथील डॉ. श्रीनिवास हे मार्गदर्शन करतील. वैद्यकीय महाविद्यायातील पदव्युत्तर विद्यार्थी व प्राध्यापक यांचाही या चर्चा सत्रात सहभाग असेल.

        डी. वाय. पाटील अभिमत विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, अधिष्ठाता डॉ. राजेंद्र नेर्ली, उपअधिष्ठाता डॉ. राजेश ख्यालाप्पा, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैशाली गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली या परिषदेसाठी सर्व तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती सहयोगी प्राध्यापक डॉ. अमित बुरांडे यांनी दिली. 

      कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In उद्योग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ ता…