
no images were found
नरेंद्र मोदी यांनी घोषीत केलेल्या राष्ट्रीय जनऔषधी दिनाचा देशभर प्रचार-प्रसार,
कोल्हापूर (प्रतिनिधी):-देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७ मार्च हा दिवस राष्ट्रीय जनऔषधी दिन म्हणून जाहीर केला आहे. सर्वसामान्य जनतेला सुमारे ८० टक्के सवलतीच्या दरात जनऔषधे म्हणजेच जेनेरिक मेडीसिन मिळू शकतात. या योजनेचा प्रचार-प्रसार करण्यासाठी, पंतप्रधान मोदी यांनी १ ते ७ मार्च हा जनऔषधी सप्ताह घोषीत केला. तर आज प्रत्येक जिल्हयात जनऔषधी दिनाची संकल्पना, या औषधांची गुणवत्ता आणि उपयोग, याबाबत जनजागृती करण्यात आली. खासदार धनंजय महाडिक यांच्याकडे पुणे जिल्हयाची जबाबदारी असल्याने, आज खासदार महाडिक यांनी पुण्यात जनऔषधी दिनाचे महत्व आणि संकल्पना याबद्दल संपर्क मोहिम राबवली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ ते ७ मार्च दरम्यान जनऔषधी सप्ताह घोषीत केला. जनऔषधी दिवस म्हणजेच जेनेरिक औषधांबद्दल सर्वसामान्य नागरिकांमध्ये जागरूकता वाढावी, कमी किंमतीत गुणवत्तापूर्ण असलेल्या औषधांचा वापर वाढावा, यासाठी पंतप्रधानांनी ७ मार्चचा दिवस जनऔषधी दिवस जाहीर केला आहे. खासदार धनंजय महाडिक यांना पुणे जिल्हयाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे खासदार महाडिक यांनी आज पुण्यातील विविध नागरी संस्था, संघटना यांच्याशी संपर्क आणि संवाद साधून, जनऔषधी संकल्पनेचा प्रचार केला. तसेच पुण्यातील सदाशिव पेठमधील प्रधानमंत्री जनऔषधी केंद्राला भेट देवून, तिथे आलेल्या रूग्णांशी आणि कुटुंबियांशी खासदार महाडिक यांनी संवाद साधला. सध्या संपूर्ण देशात १५ हजार जनऔषधी दुकाने असून, पुढील दोन वर्षात २५ हजार जनऔषधी दुकाने सुरू करण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. कोणत्याही नामांकीत कंपनीच्या औषधाइतकीच प्रभावी आणि उपयुक्त असलेली जेनेरिक मेडीसिन, ५० ते ९० टक्के स्वस्त दराने मिळतात. त्यामुळे २०१९ पासून रूग्णांची तब्बल ३६ हजार कोटी रुपयांची आर्थिक बचत झाली आहे. केंद्र सरकारने २०१९ मध्ये जनऔषधी सुगम मोबाईल अॅप्लिकेशन सुरू केले असून, त्यातून जवळचे जेनेरिक मेडिसिन दुकान कुठे आहे, ब्रँडेड औषधाच्या तुलनेत कोणते जेनेरिक औषध उपलब्ध आहे, त्यातून किती आर्थिक बचत होते, याबद्दल माहिती दिली जाते. या अॅपचा नागरिकांनी जास्तीत जास्त वापर करावा, जनऔषधी दुकानातून आवश्यक औषधे खरेदी करावीत, असे आवाहन खासदार महाडिक यांनी केले. यावेळी राज्यसभेच्या खासदार मेधाताई कुलकर्णी, प्रमोद कोंढरे, श्रीपाल समदरिया, विशाल अमृतकर उपस्थित होते.