
no images were found
महिला व बालकल्याण विभागामार्फत शहरातील महिला व मुलींना मोफत एमएससीआयटीचे प्रशिक्षण
कोल्हापूर (प्रतिनिधी):- महापालिकेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत शहरातील महिला व मुलींच्या सक्षमीकरणासाठी प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या मान्यतेने मोफत एमएससीआयटी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणासाठी वयवर्षे 18 ते 45 असणे आवश्यक आहे, रहिवासी दाखला, जन्म तारखेचा पुरावा म्हणून जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला, सन 2023-24 चा उत्पनाचा दाखला (उत्पन्न मर्यादा 2 लाखाच्या आत असणे आवश्यक), स्वयंघोषणापत्र, रेशनकार्ड, आधार कार्ड, दोन आयडेंटी साईज फोटो आवश्यक आहे. सदरचे अर्ज महापालिकेच्या मुख्य इमारतमधील महिला व बालकल्याण विभागात दि. 21 मार्च 2025 अखेर सादर करावेत. याकरीता अर्जाचा नमुना, अटी शर्ती व स्वयंघोषणापत्र नमुना कोल्हापूर महानगरपालिकेच्या www.kolhapurcorporation.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे. तरी शहरातील पात्र महिला व मुलींनी या मोफत प्रशिक्षण योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन महापालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.