no images were found
स्कोडा कायलॅक भारतात अधिकृतरित्या लाँच
कोल्हापूर : स्कोडा ऑटो इंडियाची पहिलीच सब-४ मीटर एसयूव्ही कायलॅक भारतात अधिकृतरित्या लाँच करण्यात आली आहे, जो ब्रँडसाठी मोठा टप्पा ठरला आहे. या लाँचसह कायलॅकने भारतातील झपाट्याने विकसित होत असलेल्या एसयूव्ही बाजारपेठेत स्कोडासाठी नवीन क्षमता खुल्या केल्या आहेत. ही उच्च मागणी असलेल्या सब-४-मीटर सेगमेंटमधील ब्रँडची पहिली ऑफरिंग आणि भारतातील पहिली मॉडेल आहे, जिच्यामध्ये स्कोडाची नवीन मॉडर्न सॉलिड डिझाइन शैली, प्रबळता, कार्यक्षमता आणि विश्वसनीयता आहेत. आजपासून ग्राहकांसाठी डिलिव्हरीज व टेस्ट ड्राइव्ह्ज सुरू होत आहे.
स्कोडा ऑटो इंडियाचे ब्रँड संचालक पीटर जनेबा म्हणाले, ”कायलॅक अधिकृतरित्या लाँच करण्यात आली आहे आणि आगामी वर्षांमध्ये भारतातील स्कोडाच्या विकासगतीला चालना देण्यास सज्ज आहे. आजपासून या कारची उपलब्धता स्कोडा ऑटो इंडियासाठी न्यू एराला सादर करते. या कारमध्ये सुरक्षितता, अपवादात्मक ड्रायव्हिंग गतीशीलता आणि सेगमेंट-लीडिंग वैशिष्ट्ये आहेत. कुशक व स्लाव्हियाला मिळालेल्या यशानंतर कायलॅकने आमचे भारत-केंद्रित उत्पादन धोरण कायम ठेवले आहे, ज्यामुळे आम्हाला नवीन बाजारपेठांमध्ये प्रवेश करण्यास आणि स्कोडा कुटुंबामध्ये अधिकाधिक ग्राहकांना आणण्यास मदत होत आहे. कारच्या किफायतशीर दरासह आम्ही सांगू शकतो की, कायलॅक निश्चितच भारतातील रस्त्यांवर युरोपियन तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण करते.”
कायलॅकला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि स्पर्धात्मक सब-४-मीटर एसयूव्ही सेगमेंटमधील या कारच्या प्रबळ अपीलसह स्कोडा ऑटो इंडियाला प्रबळ विक्री गती संपादित करण्याचा विश्वास आहे. कंपनीने २०२६ पर्यंत १ लाख वार्षिक विक्रीचा टप्पा गाठण्याचे ध्येय स्थापित केले आहे, ज्याला कायलॅकची सेगमेंट-लीडिंग वैशिष्ट्ये, अपवादात्मक सुरक्षितता मापदंड आणि भारतातील रस्त्यांसाठी युरोपियन तंत्रज्ञानाचे पाठबळ आहे, जे ग्राहकांशी संलग्न आहे. हा धोरणात्मक फोकस स्कोडा ऑटो इंडियाच्या फूटप्रिंट वाढवण्याप्रती आणि देशभरातील अधिकाधिक ग्राहकांना प्रीमियम मोबिलिटी सोल्यूशन्स देण्याप्रतीच्या कटिबद्धतेशी संलग्न आहे.