Home सामाजिक झुनो जनरल इन्शुरन्सने ‘टॉकिंग झेब्रा’ मोहिमेद्वारे रस्ते सुरक्षा आणली प्रत्यक्षात

झुनो जनरल इन्शुरन्सने ‘टॉकिंग झेब्रा’ मोहिमेद्वारे रस्ते सुरक्षा आणली प्रत्यक्षात

10 second read
0
0
23

no images were found

झुनो जनरल इन्शुरन्सने ‘टॉकिंग झेब्रा’ मोहिमेद्वारे रस्ते सुरक्षा आणली प्रत्यक्षात

गोवा,: झुनो जनरल इन्शुरन्स म्हणजेच पूर्वीची एडलवाइज जनरल इन्शुरन्स या नव्या युगातील डिजिटल विमा कंपनीने रस्ते सुरक्षा जागृतीसाठी ‘द टॉकिंग झेब्रा’ ही एक आगळीवेगळी मोहीम सुरू केली आहे. वाहनचालक आणि पादचाऱ्यांना वाहतुकीचे नियम पाळण्याचे महत्त्व प्रभावी आणि लक्षात राहणाऱ्या पद्धतीने पटवून देणे, या मोहिमेचा उद्देश आहे.

16 जानेवारी ते 25 जानेवारीदरम्यान ही मोहीम राबविण्यात येत असून, झुनो जनरल इन्शुरन्सच्या सुरक्षित रस्ते आणि जबाबदार वाहनचालनाच्या प्रोत्साहनासाठीच्या वचनबद्धतेचा एक भाग आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) जानेवारी हा रस्ते सुरक्षा महिना म्हणून जाहीर केल्याच्या अनुषंगाने या मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. रस्ते अपघात कमी करण्यावर संपूर्ण देशाचे लक्ष केंद्रित करणे आणि रस्ता जबाबदारीने वापरण्याची संस्कृती निर्माण करणे हा ‘टॉकिंग झेब्रा’ मोहिमेद्वारे झुनोचा उद्देश आहे.

‘टॉकिंग झेब्रा’ मोहीम ही एक नाविन्यपूर्ण आणि आगळीवेगळी कल्पना आहे. यात रहदारी असलेल्या सिग्नलवर एक हुशार आणि संवाद साधणारा झेब्रा साकारला जातो. या मोहिमेअंतर्गत, झेब्रा क्रॉसिंगचे प्रतीक असलेल्या झेब्र्याच्या वेषातील एक प्रमोटर सतत वाहनांचा राबता असलेल्या सिग्नलवर लोकांशी संवाद साधेल. ही मोहीम मुंबई, गोवा, कोलकाता, दिल्ली, हैदराबाद आणि बेंगळुरू या सहा मोठ्या शहरांमध्ये राबविण्यात येत आहे. झेब्र्याच्या वेशातील शुभंकर (मॅस्कॉट) वाहनचालक आणि पादचाऱ्यांशी संवाद साधत हुशारी आणि विनोदाचा वापर करून रस्ता सुरक्षेचे महत्त्व अधोरेखित करेल. “संयम राखा, वाहतुकीचे नियम पाळा” असे स्मरण करून देत झेब्रा लोकांना झेब्रा क्रॉसिंगचा आदर करणे, लाल दिव्याच्या वेळी थांबणे आणि नियमबाह्यपणे रस्ता ओलांडणे टाळणे यांसारख्या मूलभूत गोष्टींचे महत्त्व पटवून देईल.

झुनो जनरल इन्शुरन्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शानाई घोष यांनी सांगितले, “रस्ते सुरक्षा ही महत्त्वाची आणि सामूहिक जबाबदारी आहे. झुनोमध्ये आम्ही असे उपक्रम राबवण्यास कटिबद्ध आहोत, जे सकारात्मक आणि दीर्घकालीन बदल घडवतील. ‘टॉकिंग झेब्रा’ मोहीमेमध्ये शिक्षण आणि मनोरंजन यांची सांगड घालण्यात आली आहे. या मोहिमेद्वारे वाहनचालक आणि पादचाऱ्यांना रस्त्यावर योग्य वर्तन करण्यास प्रोत्साहन देण्यात येते.  आम्ही जागरुकता करण्यासोबतच ‘पे-हाऊ-यू-ड्राइव्ह’ (PHYD) सारख्या टेलीमॅटिक्स-आधारित उपक्रमाद्वारे वर्तन बदलण्यासाठी बक्षिसांचा (रिवॉर्ड्) उपयोग केला आहे. या उपक्रमाद्वारे चांगल्या वाहनचालनासाठी कार विमा प्रीमियमवर सवलती दिल्या जातात. पीएचवायडी उपक्रमामुळे वाहनचालक सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य सवयी अंगीकारण्यास प्रवृत्त होतील. परिणामी, देशभरात रस्ते सुरक्षित होण्यास, अपघातांचे प्रमाण कमी होण्यात, घटण्यास हातभार लागेल.”

भारतामध्ये दरवर्षी पादचाऱ्यांचे अपघात मोठ्या प्रमाणात घडतात. वाहतुकीचे नियम आणि झेब्रा क्रॉसिंगचा आदर न करणारे बेफिकीर वाहनचालक, हे याचे प्रमुख कारण आहे. गेल्या 5 वर्षांत कोलकातामध्ये अपघातांच्या संख्येत सुमारे 15% वाढ झाली आहे. अवजड वाहनांची वाहतूक, वाहतुकीच्या नियमांचे पालन न होणे आणि झेब्रा क्रॉसिंगसारख्या सुरक्षा उपाययोजनांची योग्य अंमलबजावणी न होणे यामुळे पादचाऱ्यांच्या सुरक्षेची चिंता वाढली आहे. आयआयटी दिल्लीच्या टीआरआयपी (ट्रिप) सेंटरने प्रकाशित केलेल्या “रस्ते सुरक्षेसंदर्भातील भारताची स्थिती 2024” (India Status Report on Road Safety) या अहवालानुसार, भारताला रस्ते अपघातांमधील मृत्यू कमी करण्याच्या प्रयत्नांमध्ये अपेक्षित प्रगती साधता आलेली नाही. इतर क्षेत्रांतील प्रगती असूनही रस्ते अपघातांमुळे होणाऱ्या जखमा हे सार्वजनिक आरोग्यासाठी मोठे आव्हान राहिले आहे, आणि बहुतेक राज्यांना 2030 पर्यंत रस्ता अपघातातील मृत्यू निम्म्यावर आणण्याच्या संयुक्त राष्ट्रांच्या उद्दिष्टांपर्यंत पोहोचणे शक्य होणार नाही. रस्ते सुरक्षा क्षेत्रातील आघाडीवर असलेल्या स्वीडनसारख्या देशांशी भारताची तुलना केल्यास, 1990 मध्ये एका स्वीडनमधील व्यक्तीच्या तुलनेने भारतीयाचा रस्ते अपघातात मृत्यू होण्याची शक्यता 40% अधिक होती. 2021 ही शक्यता वाढून 600% झाली आहे.

‘भारतातील रस्ते अपघातांवरील वार्षिक अहवालानुसार (2022)’ भारतात 4,61,312 अपघातांची नोंद झाली. गेल्या पाच वर्षांत हा आकडा फक्त 1% ने कमी झाला आहे. या अपघातांमध्ये 1,68,491 मृत्यू आणि 4,43,366 जखमींची नोंद झाली आहे. सरासरी पाहता, भारतात दर तासाला 53 अपघात होतात आणि 92 जणांचा मृत्यू होतो. जागतिक आकडेवारीनुसार, भारत रस्ते अपघातांच्या संख्येत जगात सर्वात आघाडीवर आहे.

झुनो जनरल इन्शुरन्सच्या मार्केटिंग आणि कम्युनिकेशन्स विभागाचे प्रमुख व उपाध्यक्ष केतन माणकीकर म्हणाले, “‘द टॉकिंग झेब्रा’ ही केवळ एक मोहीम नसून संवाद सुरू करणारी चळवळ आहे. प्रत्येकाला वाहतुकीचे नियम पाळण्याची प्रेरणा देऊन रस्ते अधिक सुरक्षित बनवण्याचा प्रयत्न या चळवळीच्या माध्यमातून करण्यात आला आहे. विनोद आणि कोपरखळ्यांचा वापर करून आम्ही रस्ते सुरक्षा अधिक जवळची, लक्षात राहणारी आणि परिणामकारक करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. विनोदबुद्धी आणि सर्जनशीलतेच्या माध्यमातून ‘द टॉकिंग झेब्रा’ वाहनचालकांवर छाप पाडण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे त्यांच्या वर्तनात सकारात्मक बदल घडेल. सोपी, सहजसुलभ आणि खात्रीशीर सेवा देणारा ब्रँड म्हणून, आम्हाला ही कल्पना प्रत्यक्षात आणताना आणि रस्त्यांवर सकारात्मक बदल घडताना पाहण्याचा आनंद होत आहे.”

ही मोहिमेच्या माध्यमातून पादचाऱ्यांच्या सुरक्षेच्या समस्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. यात चालक आणि पादचारी दोघांसाठी लागू होणाऱ्या नावीन्यपूर्ण आणि सर्जनशील कल्पनांचा समावेश आहे.

मोहीम अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि मोहिमेचा प्रभाव वाढवण्यासाठी झुनो जनरल इन्शुरन्सने लोकप्रिय रेडिओ चॅनेल रेड एफएमसोबत भागीदारी केली आहे. ‘द टॉकिंग झेब्रा’चा आवाज रेडिओच्या माध्यमातून अधिक लोकांपर्यंत पोहोचेल. झुनो जनरल इन्शुरन्सतर्फे ही मोहीम सर्वांपर्यंत पोहचिवण्यात येत असून लोकांना सोशल मीडियावर #TalkingZebra, #RespectTheStripes, आणि #StayCoolFollowRules या हॅशटॅगसह या चळवळीत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे.

झुनो जनरल इन्शुरन्सतर्फे सर्वांना ‘द टॉकिंग झेब्रा’ मोहिमेत सहभागी होण्याचे आणि वाहतुकीचे नियम पाळण्याची शपथ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. चला, एकत्र येऊ या, झेब्रा क्रॉसिंगचा आदर करू या, सुरक्षित राहू या आणि आपले रस्ते सर्वांसाठी अधिक चांगले करू या.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन   कोल्हापूर,(प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठात शि…