Home मनोरंजन यश आणि मी तिला तिच्या शालेय अभ्यासामध्ये मदत करतो.”-तितिक्षा श्रीवास्तव

यश आणि मी तिला तिच्या शालेय अभ्यासामध्ये मदत करतो.”-तितिक्षा श्रीवास्तव

0 second read
0
0
11

no images were found

यश आणि मी तिला तिच्या शालेय अभ्यासामध्ये मदत करतो.”-तितिक्षा श्रीवास्तव

हे तर आपल्याला ठाऊकच आहे की टीव्हीवरील मालिका म्हणजे 24×7 काम असून आपली जागृति – ऊर्फ अस्मी देव मात्र तिचे हे काम अतिशय सहजपणे हाताळत आहे. आपल्या अभ्यासासोबत अभिनयाच्या आपल्या कामाचे अतिशय योग्य संतुलन ती साधत आहे कारण तिला तिचे ऑनस्क्रिन पालक तितिक्षा श्रीवास्तव (गीता) आणि यश गेरा (हरीश) यांच्याकडून कायम समर्थन लाभते आणि त्यामुळे तिचा अभ्यास आणि तिची व्यक्तिरेखा साकारणे हे सहजपणे होत राहते.

त्यांनी चित्रीकरण करायला सुरुवात केल्यापासून अस्मीला त्यांच्याकडून हा उबदारपणा जाणवला आणि मार्गदर्शन मिळाले. ते केवळ तिचे पडद्यावरील पालक नसून आता तिचे दोन उत्तम मेंटॉर्सही बनले आहेत जे तिला मनापासून मार्गदर्शन करतात. ब्रेक्समध्ये तिच्या शालेय अभ्यासातील मदतीपासून तिला योग्य प्रकारे आराम मिळत आहे याचीही ते पूर्णपणे खात्री करतात. ते दोघेही तिची चांगली काळजी घेतात आणि तिच्याप्रती अगदी समर्पित आहेत. त्यांच्यातील नाते निव्वळ स्पॉटलाइटच्या पलीकडे असून या उत्तम ऑफस्क्रीन नात्याची झलक त्यांच्या ऑनस्क्रीन नात्यामधूनही दिसून येते.

तितिक्षा श्रीवास्तव म्हणाली, “आमच्या ‘जागृति – एक नई सुबह’ परिवारातील अस्मी ही सर्वांत लहान सदस्य आहे आणि त्यामुळे सेटवर सर्वांची लाडकी आहे. ती केवळ सात वर्षांची असली तरी तिची प्रतिभा आम्हाला थक्क करते आणि दुसऱ्यांकडून सातत्याने काही ना काही नवीन शिकण्याची तिची इच्छा असते. तिला परमेश्वराकडून निश्चितच देणगी मिळाली असून ती तिच्या वयाच्या मानाने अभ्यासात अतिशय हुशार आहे. आमच्या ब्रेक्सदरम्यान यश आणि मी तिच्यासोबत बसतो आणि तिच्या शालेय अभ्यासात तिला मदत करतो. काही वेळा अगदी तिच्या बरोबर अगदी नुसते बसले तरी तिला पुरेसे असते. ती अतिशय मेहनती आणि समर्पित मुलगी असून तिच्यासोबत ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन समय व्यतीत करताना आम्हाला अतिशय आनंद वाटतो. आपला अभ्यास आणि काम एवढ्या कोवळ्या वयात इतक्या सुंदर पद्धतीने ती सांभाळत आहे ते पाहताना मला तिच्या अतिशय अभिमान वाटतो.”

यश गेरा म्हणाला, “अस्मी म्हणजे ऊर्जा आणि कलेचा छोटा धमाका आहे आणि तिच्या आजूबाजूला असताना मला आपल्या लहानपणीच्या स्वप्नांचे संगोपन करण्याच्या महत्वाची जाणीव होते. आम्ही ऑनस्क्रीन तिचे पालक असलो तरी ऑफस्क्रीनही तिला मार्गदर्शन करण्यासाठी वचनबद्ध आहोत. मग तिच्या अभ्यासातील कठीण होम वर्क प्रॉब्लेम सोडवणे असो किंवा ब्रेक्समध्ये गप्पा गोष्टी करून तिला हसवणे असो, तिला छान वाटावे आणि आम्ही तिची काळजी घ्यावी यासाठी आम्ही सर्व काही करतो. एवढ्या उत्साहाने अभ्यास आणि चित्रीकरण यांच्यामध्यें संतुलन साधताना तिला पाहणे अतिशय प्रेरणादायी आहे आणि तिच्या प्रवासाचा हिस्सा बनताना मला भाग्यशाली वाटत आहे. शेवटी आम्ही केवळ सहकलाकार नसून एक कुटुंब असल्याची भावना निर्माण होते.”

यश, तितिक्षा आणि अस्मी यांचे ऑफस्क्रिन नाते अतिशय सुंदरपणे जुळून आले असून प्रेक्षकांसाठी हे पाहणे रोचक ठरेल की काय गीता हरीश आणि जागृती यांना कलिकांत ठाकुर (आर्य बब्बर) च्या दुष्ट हेतूंमधून वाचवू शकेल?

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

२२ व्या ‘महाटेक २०२५’ या भव्य औद्योगिक प्रदर्शनाची ०६ फेब्रुवारी २०२५ पासून सुरुवात

२२ व्या ‘महाटेक २०२५’ या भव्य औद्योगिक प्रदर्शनाची ०६ फेब्रुवारी २०२५ पासून सुरुवात …