
no images were found
महापालिकेच्या 52 व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण
कोल्हापूर (प्रतिनिधी):- कोल्हापूर महानगरपालिकेच्या 52 व्या वर्धापन दिनानिमित्त रविवारी महानगरपालिकेच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात प्रशासक कार्तिकेयन एस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत शपथ घेण्यात आली.
यावेळी प्रशासक कार्तिकेयन एस यांनी बोलताना महापालिकेच्या 52 व्या वर्धापन दिनानिमित्त सर्वाना हार्दिक शुभेच्छा दिल्या. कोल्हापूर शहर हे ऐतिहासिक शहर आहे. हे शहर लंडन पॅरिसपेक्षाही ऐतिहासिक आहे. अशा या ऐतिहासिक शहरामध्ये मला व तुंम्हाला काम करण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्य समझतो. शहरातील नागरीकांना चांगल्या सुविधा महापालिका पुरविण्यास कटिबद्ध आहे. कोल्हापूरकर जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जाऊन अभिमानाने सांगू शकतात की, मी कोल्हापूरचा आहे. शहराबरोबरच मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून शहराच्या आजूबाजूची गावेही स्वच्छ ठेवण्याची मी जबाबदारी घेतो. येणाऱ्या वर्षात कोल्हापूरला जगातील सर्वोत्तम व स्वच्छ शहर आपण सर्वांनी मिळून बनवूया असे सांगितले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे, उप-आयुक्त साधना पाटील, सहा.आयुक्त नेहा आकोडे, स्वाती दुधाणे, उज्वला शिंदे, मुख्य लेखापरिक्षक कलावती मिसाळ, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, जल अभियंता हर्षजीत घाटगे, नगरसचिव सुनील बिद्रे, प्रशासन अधिकारी आर व्ही कांबळे, करनिर्धारक व संग्राहक सुधाकर चलावाड, उपशहर रचनाकार रमेश मस्कर, एन.एस.पाटील, उपशहर अभियंता महादेव फुलारी, आर के पाटील, सुरेश पाटील, इस्टेट ऑफिसर विलास साळोखे, मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार, रचना व कार्यपध्दती अधिकारी प्रशांत पंडत, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्राबरे, विधी अधिकारी संदीप तायडे, सिस्टीम मॅनेजर यशपालसिंग रजपूत, महिला व बालकल्याण अधीक्षक प्रिती घाटोळे, एलबीटी अधिक्षक विश्वास कांबळे, महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.