Home सामाजिक आठवे ‘इंटरनॅशनल युनिफॉर्म मॅन्युफॅक्चरिंग फेअर २०२४ यंदा बेंगळूरू येथे

आठवे ‘इंटरनॅशनल युनिफॉर्म मॅन्युफॅक्चरिंग फेअर २०२४ यंदा बेंगळूरू येथे

4 min read
0
0
101

no images were found

आठवे ‘इंटरनॅशनल युनिफॉर्म मॅन्युफॅक्चरिंग फेअर २०२४ यंदा बेंगळूरू येथे

 

भारत –‘सोलापूर गारमेंट मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन(एसजीएमए) ने आठव्या ‘इंटरनॅशनल युनिफॉर्म मॅन्युफॅक्चरिंग फेअर २०२४’चे आयोजन केले असून ते १८ ते २० डिसेंबर २०२४ दरम्यान बेंगळूरू येथे होणार आहे. त्याचे उद्घाटन महाराष्ट्राचे राज्यपाल श्री सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते पहिल्या दिवशी होणार आहे. या प्रदर्शनामध्ये गणवेश क्षेत्रातील उत्पादक, पुरवठादार आणि वितरक सहभागी होणार असून या प्रदर्शनाच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या व्यासपीठावर त्यांना त्यांची उत्पादने सादर करण्याची संधी मिळणार आहे. संभावित ग्राहकांशी जोडले जाणे त्यांना त्याद्वारे शक्य होणार आहे. त्याशिवाय या क्षेत्रातील नवीन ट्रेंड काय आहेत, हे जाणून घेणेही शक्य होणार आहे.

या प्रदर्शनामध्ये १२० आघाडीचे ब्रँड सहभागी होणे अपेक्षित असून गणवेश कापडाच्या १० हजारहून अधिक डिझाइन तसेच गणवेश कापडाच्या २५ हजारहून अधिक डिझाईन व अॅक्सेसरिज या प्रदर्शनामध्ये असणार आहेत.  तीन दिवस चालणारे हे प्रदर्शन गेट नंबर ८, श्रीनगर पॅलेस ग्राउंड, जयामहल, बेंगळूरू, कर्नाटक येथे होणार आहे. आंतरराष्ट्रीय युनिफॉर्म आणि गारमेंट प्रदर्शन हे सोलापूर गारमेंट मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन (एसजीएमए)ने आयोजित केले आहे. एसजीएमएनेच या वार्षिक आयोजनाची संकल्पना राबविली आणि गेली सात वर्षे ती यशस्वीपणे अमलात आणली आहे.

विविध राज्यांमध्ये या वार्षिक प्रदर्शनांच्या सात आवृत्त्यांचे आयोजन केल्यानंतर युनिफॉर्म मॅन्युफक्चरर्स फेअर हे आता गणवेश आणि कापड उद्योगासाठी एक आश्वासक असे व्यासपीठ म्हणून स्थापित झाले आहे. या व्यासपीठाच्या माध्यमातून या क्षेत्राशी संबंधित घटक आणि व्यवसायांना आघाडीच्या गणवेश कापड व वस्त्र उत्पादकांशी संवाद साधण्याची संधी प्राप्त होते. त्या माध्यमातून त्यांना त्यांच्या व्यवसायाचा विस्तार करता येतो.

या क्षेत्रातील जे विविध घटक या प्रदर्शनामध्ये सहभागी होणार आहेत त्यांच्यामध्ये शालेय गणवेश, बेल्ट व टाय, क्रीडा गणवेश, लोगो व प्रिंट, हिवाळी कपडे, महाविद्यालय गणवेश, शालेय बूट व सॉक्स, विविध गणवेशांचे कपडे, शालेय व महाविद्यालयांसाठी लागणाऱ्या बॅगा तसेच रुग्णालय गणवेश, ब्लेझर या गोष्टींच्या उत्पादकांचा समावेश आहे. या प्रदर्शनामध्ये १२०हूनही अधिक ब्रँड सहभागी होणार असून एकाच छताखाली त्यांना आपल्या उत्पादनांचे प्रदर्शन करता येणार आहे. गणवेश उत्पादनामध्ये असलेल्या जवळजवळ सर्वच कंपन्या या प्रदर्शनामध्ये सहभागी होणार आहेत. मफतलाल, काका, आणि फिझीकल यांसारखे आघाडीचे ब्रँड यात सहभागी होणार असून गणवेश कापडाची १० हजार डिझाईन आणि गणवेश वस्त्रांची २० हजार डिझाईन या प्रदर्शनात उपलब्ध असतील. त्याशिवाय टाय, बेल्ट, शाळेचे शु, बॅगा, ब्लेझर आणि कापडासंबंधी मशीनची जी उत्पादने आहेत ती या प्रदर्शनामध्ये असतील.जगातील गणवेशाची बाजारपेठ २०२०मध्ये ६.२ अब्ज डॉलर एवढी होती ती २०२१मध्ये ८.४ अब्ज डॉलर झाली आहे आणि २०३०मध्ये ती २५ अब्ज डॉलर होणे अपेक्षित आहे, असे उद्गार प्रदर्शनचे अध्यक्ष श्री सुनील मेंगजी यांनी काढले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जन आरोग्य योजना अधिक पारदर्शक व प्रभावी करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस:न्यू एरा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्‌घाटन

जन आरोग्य योजना अधिक पारदर्शक व प्रभावी करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस:न्यू एरा मल्टी …