Home मनोरंजन ‘श्रीमद् रामायण’ मध्ये लव आणि कुश ही श्रीराम आणि सीतेची मुले असल्याचे सत्य हनुमानाला समजले

‘श्रीमद् रामायण’ मध्ये लव आणि कुश ही श्रीराम आणि सीतेची मुले असल्याचे सत्य हनुमानाला समजले

7 second read
0
0
18

no images were found

‘श्रीमद् रामायण’ मध्ये लव आणि कुश ही श्रीराम आणि सीतेची मुले असल्याचे सत्य हनुमानाला समजले

सोनी सबवरील ‘श्रीमद् रामायण’ ही भव्य दिव्य मालिका श्रीराम (सुजय रेऊ) आणि सीता (प्राची बंसल) यांची कथा सांगते. अलीकडच्या भागांमध्ये प्रेक्षकांनी पाहिले की, लव (शौर्य मंडोरिया) आणि कुश (अथर्व शर्मा) यांनी अश्वमेधाचा घोडा अडवल्यानंतर त्याच्या रक्षणार्थ आलेल्या शत्रुघ्न (सामर्थ्य गुप्ता)ला त्या जुळ्या भावंडांनी पराजित केले.आपला पराजय स्वीकारत शत्रुघ्नने बेशुद्ध होण्याअगोदर ती दोन्ही मुले सामर्थ्यशाली असल्याचे कबूल केले. कथानकातील तो एक लक्षणीय क्षण होता.

आगामी भागांमध्ये शत्रुघ्नचा पराजय झाल्याची बातमी अयोध्येपर्यंत पोहोचली व ती ऐकून श्रीराम चिंतित झाले. लक्ष्मण (बसंत भट्ट) आणि हनुमान (निर्भय वाधवा) मिळून शत्रुघ्नचा पराजय कसा झाला याचा शोध घेऊ लागले. हा पराक्रम करणाऱ्या दोन छोट्या मुलांबद्दल त्यांना कुतूहल वाटू लागले. ‘सर्वप्रथम त्यांचा उद्देश जाणून घ्या’ हा श्रीरामाचा सल्ला ऐकून हनुमानाने त्या दोन मुलांचा माग काढला.ते दोघे लव आणि कुश असल्याचे त्याला समजले. त्याने त्या दोघांचा त्यांच्या आश्रमापर्यंत पाठलाग केल्यानंतर त्याला हे सत्य समजले की, ते दोघे श्रीराम आणि सीतेचे पुत्र आहेत. तो सीतेला विचारतो की श्रीरामाला तो हे सांगू शकतो का?

‘श्रीमद् रामायण’ मालिकेत हनुमानाची भूमिका करत असलेला निर्भय वाधवा म्हणतो,“श्रीराम आणि सीता यांच्या ठायी असलेली हनुमानाची भक्ती कर्तव्याच्या पलीकडे जाणारी आहे. ते एक दिव्य नाते आहे. शत्रुघ्नला पराभूत करणारी ते दोन तरुण योद्धे श्रीरामाचे पुत्र असल्याचे कळल्यावर हनुमानाला प्रचंड आनंद आणि अभिमान वाटतो आणि हे दृश्य साकारणे हा माझ्यासाठी खूप भावुक क्षण होता. या दृश्यात नियतीचे सौंदर्य आणि कौटुंबिक नात्यांची दृढता टिपले आहे. प्रेक्षकांसाठी हा क्षण जिवंत करण्याचे भाग्य मला लाभले हा मी माझा गौरव मानतो.”

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

स्‍कोडा कायलॅक भारतात अधिकृतरित्‍या लाँच

स्‍कोडा कायलॅक भारतात अधिकृतरित्‍या लाँच   कोल्हापूर : स्‍कोडा ऑ…