Home Uncategorized जागतिक अन्न दिनानिमित्त विद्यापीठात विविध उपक्रम

जागतिक अन्न दिनानिमित्त विद्यापीठात विविध उपक्रम

0 second read
0
0
27

no images were found

जागतिक अन्न दिनानिमित्त विद्यापीठात विविध उपक्रम

कोल्हापूर (प्रतिनिधी): शिवाजी विद्यापीठाच्या अन्नशास्त्र आणि तंत्रज्ञान अधिविभागातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही उद्या (दि. १८) जागतिक अन्न दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
अन्नशास्त्र व तंत्रज्ञान अधिविभागामार्फत जागृतीपर उपक्रमांतर्गत पोस्टर प्रदर्शन, प्रात्यक्षिक सादरीकरण आदींचे आयोजन केले आहे. आज समाजमाध्यमांच्या कालखंडात फसव्या व दिशाभूल करणाऱ्या बाबींचा प्रसार झपाट्याने होतो. याचाच वापर अनेकदा प्रक्रियायुक्त अन्नपदार्थांना तसेच तत्सम उत्पादने निर्माण करणाऱ्या उत्पादकांना बदनाम करण्यासाठी देखील केला जातो. याबाबत जनमानसातील संभ्रम दूर करण्याच्या उद्देशाने अधिविभागातील विद्यार्थ्यांमार्फत अन्न प्रक्रिया उत्पादनांबाबतचे माहितीपर स्टॉल्स लावण्यात येणार आहेत. शिवाजी विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊसाहेब सभागृहात उद्या सकाळी ११ वाजल्यापासून सदर स्टॉल्स संध्याकाळी ६ वाजेपर्यंत खुले
राहतील. इच्छुक सजग नागरिकांनी या उपक्रमास भेट देऊन योग्य माहिती घ्यावी, असे आवाहन अन्नशास्त्र व तंत्रज्ञान अधिविभागाचे प्रमुख डॉ. प्रवीणकुमार पाटील यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. अभिजीत गाताडे (९०२८७८५८०७) व डॉ. हर्षवर्धन आप्पासो कांबळे (९९७५६५९२४६) यांच्याशी संपर्क साधावा, असेही कळविले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन   कोल्हापूर,(प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठात शि…