Home Uncategorized मतदार याद्यांच्या संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची ७ ऑगस्ट  रोजी बैठक

मतदार याद्यांच्या संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची ७ ऑगस्ट  रोजी बैठक

7 second read
0
0
66

no images were found

मतदार याद्यांच्या संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची ७ ऑगस्ट  रोजी बैठक

 

कोल्हापूर : मतदार याद्यांच्या संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत पुणे विभागाचे विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार हे सुधारीत कार्यक्रमानुसार दि. ७ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी ३.३० वाजता श्री शाहुजी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व खासदार, आमदार, राजकीय पक्षाचे जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्ष, प्रतिनिधी यांची बैठक घेणार आहेत.

 मा. भारत निवडणूक आयोगाने दि. १ जुलै २०२४ या अर्हता दिनांकावर (Qualifying Date) आधारीत विशेष पुनरीक्षण कार्यक्रम (दुसरा) कार्यक्रम घोषित केला आहे. या अनुषंगाने राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी पुणे विभागाच्या विभागीय आयुक्तांना पुणे विभागातील ५ जिल्ह्यांसाठी मतदार यादी निरीक्षक म्हणून नियुक्त केले आहे.

विशेष पुनरीक्षण कार्यक्रमा बाबत काही सूचना असल्यास दि. ६ ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत dydeokolhapur@gmail.com या ई-मेल वर पाठवाव्यात, असे आवाहन कोल्हापूरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ ता…