
no images were found
महिलांसाठी अधिक परवडणारा जीवन विमा
मुंबई : आयसीआयसीआय प्रुडेंशियल लाइफ इन्शुरन्सने त्यांच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या आयप्रोटेक्ट स्मार्ट या टर्म इन्शुरन्स प्लॅनवर केवळ महिलांसाठी भरल्या जाणाऱ्या सर्व प्रीमियम्सवर 15% ची आजीवन सवलत आज जाहीर केली. याव्यतिरिक्त, नोकरदार महिलांना पहिल्याच प्रीमियमवर अतिरिक्त 15% ची सूट मिळेल. यामुळे त्यांना स्वत:ला तसेच त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक सुरक्षा प्रदान करणे सोपे होईल.
गंभीर आजारातील उपचारांमध्ये मदत मिळण्यासह आयप्रोटेक्ट स्मार्ट ब्रेस्ट, अंडाशय, गर्भाशय आणि गर्भाशय मुखाच्या कर्करोग अशा आजारांसह 34 गंभीर आजारांपासून संरक्षण देते. यात आरोग्य आणि जीवन विमा या दोन्हीचा समावेश आहे. महत्त्वाचे म्हणजे, निदानानंतर आरोग्य विम्याची रक्कम दिली जाते. विशेष म्हणजे, कुटुंबाच्या बचतीला बाधा न आणता तत्काळ वैद्यकीय उपचार मिळण्यासाठी आवश्यक आर्थिक मदत केली जाते.
द लॅन्सेटच्या अंदाजानुसार, 50 वर्षांखालील महिलांमध्ये कर्करोगाचे निदान होण्याचे प्रमाण जास्त आहे. शहरी भागात केवळ एकदा रुग्णालयात नेऊन उपचार करण्यासाठी जवळपास लाखभराचा खर्च येऊ शकतो. त्यामुळे वेळ आलीच तर अशा गंभीर आजारांवर उपचार करण्यासाठी महिलांकडे आर्थिक उपायांच्या उपलब्धतेचे नियोजन असणे आवश्यक आहे.
या घोषणेबाबत भाष्य करताना, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्सचे मुख्य वितरण अधिकारी श्री. अमित पल्टा म्हणाले, “कुटुंबाच्या भल्यासाठी महिला करत असलेला त्याग आणि घेत असलेली काळजी याचे आम्हाला कौतुक आहे. महिलांमधील याच सेवाभावी वृत्तीचा आदर करण्यासाठी आम्ही आमच्या सर्वात लोकप्रिय टर्म इन्शुरन्स उत्पादन आयप्रोटेक्ट स्मार्ट साठी भरल्या जाणाऱ्या सर्व प्रीमियमवर 15% ची आजीवन सवलत दिली आहे.”