Home मनोरंजन घरोघरी मातीच्या चुली मालिकेतील ऐश्वर्या-सारंगच्या लग्नात पैठणीची थीम

घरोघरी मातीच्या चुली मालिकेतील ऐश्वर्या-सारंगच्या लग्नात पैठणीची थीम

5 second read
0
0
102

no images were found

घरोघरी मातीच्या चुली मालिकेतील ऐश्वर्या-सारंगच्या लग्नात पैठणीची थीम

 

 

स्टार प्रवाहच्या घरोघरी मातीच्या चुली मालिकेत सध्या ऐश्वर्या-सारंगच्या लग्नाची धामधूम सुरु आहे. हळद, मेहंदी आणि संगीत पार पडल्यानंतर अखेर विवाहसोहळ्याचा तो क्षण जवळ आलाय. ऐश्वर्याचं लग्न सारंगसोबत होणार की सौमित्रसोबत याची उत्सुकताही क्षणाक्षणाला वाढतेय. हळद, मेहंदी आणि संगीत सोहळ्यातल्या लक्षवेधी लूकनंतर आता विवाहसोहळ्यात रणदिवे आणि विखेपाटील कुटुंबाने पारंपरिक पोशाखाला पसंती दिली आहे. लग्नात पैठणीची थीम असल्यामुळे संपूर्ण कुटुंब पैठणीच्या रंगात न्हाऊन निघालं आहे. ऐश्वर्या आणि जानकीने नऊवारी साडी आणि पारंपरिक मोत्यांच्या दागिन्यांना पसंती दिलीय. तर तिकडे ऋषिकेशचं पैठणी जॅकेट सर्वांचं लक्ष वेधून घेत होतं.

विवाहसोहळ्यातल्या या लूकविषयी सांगताना जानकी म्हणजेच अभिनेत्री रेश्मा शिंदे म्हणाली, ‘गेल्या दहा-बारा दिवसांपासून मालिकेत लग्नाच्या या सीनची धावपळ सुरु आहे. आम्हा कलाकारांसोबतच सगळ्या तंत्रज्ञ मंडळींची देखिल कसरत सुरु आहे. प्रत्येकाच्याच पेहरावाकडे विशेष लक्ष दिलं जात आहे. पारंपरिक लूक असल्यामुळे सीनसाठी तयार व्हायला दोन अडीच तास लागतात. आमचा लूक डिझाईन करणाऱ्या प्रत्येकाचच कौतुक. जानकीच्या साड्यांना प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. मला खात्री आहे लग्नातला लूकही प्रेक्षकांना आवडेल. मालिकेचं कथानक दिवसेंदिवस उत्कंठावर्धक होतंय. आमच्या सारंग भावोजी आणि ऐश्वर्याच्या लग्नाचं आग्रहाचं आमंत्रण. त्यासाठी नक्की पहा घरोघरी मातीच्या चुली सायंकाळी ७.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जन आरोग्य योजना अधिक पारदर्शक व प्रभावी करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस:न्यू एरा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्‌घाटन

जन आरोग्य योजना अधिक पारदर्शक व प्रभावी करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस:न्यू एरा मल्टी …