no images were found
भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या निधी आयटीबीआय अंतर्गत सहकार्य
कोल्हापूर( प्रतिनिधी ) : केआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयात केआयटी आय.आर.एफ. ही ना नफा ना तोटा या हेतूने सेक्शन ८ अंतर्गत नोंदणीकृत केलेली कंपनी आहे. भारताच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या निधी आयटीबीआय अंतर्गत परिसरातील विविध नवोद्योजकांकडून आर्थिक मदतीसाठी विविध प्रस्ताव मागितलेले होते.
एकूण प्रस्तावांपैकी १० प्रस्तावांना विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या वतीने ५० लाखांचा निधी मंजूर झालेला आहे. मंजूर झालेला निधी चा तपशील खालील प्रमाणे
अनु.क्र. प्रकल्पाचे नाव व्यक्तीचे नाव मंजूर निधी
१ इरॉक्स अनिकेत राजाराम वाळके ६ लाख
२ सिविड कल्टिवेशन रिषभ मल्होत्रा आणि निनाद जाधव ४ लाख
३ हेल्थ लिंक कॉप्यानियन श्रीमती मालन शिरगुपीकर आणि सौ.दिव्याराणी ५ लाख
४ एफ.आर.पी. प्रोफाइल्स अमोल कलगोंडा पाटील ६ लाख
५ डिबलर टाईप फर्टीलायझेशन मशीन संग्राम विकास पाटील ३ लाख
६ बॉयलर बर्ड्स हार्वेस्टिंग मशीन सौरभ भोसले ५ लाख
७ सलिव्हा सेंटीनल श्रुतिका दळवी २.५ लाख
८ अपारंपारिक पीएनपी अविनाश मानसिंग पुढाले ५ लाख
९ सिल्वर सोल्डरिंग मशीन श्रेयस कुलकर्णी ४.५ लाख
१० सोलर स्मार्ट ई-युनीरल सिस्टीम विनायक तातोबा कुंभार ५ लाख
११ राखीव निधी – ४ लाख
या सर्व प्रक्रियेला संस्थेचे अध्यक्ष सुनील कुलकर्णी, उपाध्यक्ष साजिद हुदली, सचिव दीपक चौगुले,संचालक डॉ.मोहन वनरोट्टी यांचे प्रोत्साहन मिळाले.भारताच्या विकासासाठी परिसरातील नवोद्योजकांच्या स्टार्टप्सना भविष्यातही केआयटी आय.आर.एफ. योग्य त्या प्रकारचे आर्थिक,तांत्रिक व व्यावसायिक मार्गदर्शन करेल असा विश्वास संस्थेचे अध्यक्ष सुनील कुलकर्णी यांनी व्यक्त केला.
केआयटी आय.आर.एफ. चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर आरळी, इंक्युबॅशन मॅनेजर श्री देवेंद्र पाठक, इंक्युबॅशन असोसिएट श्री पार्थ हजारे व अंजोरी कुंभोजे यांनी या सर्व प्रक्रियेसाठी मोलाचे तांत्रिक सहकार्य केले.