no images were found
टोयोटा किर्लोस्कर मोटरने कॉम्प्रेहेन्सिव्ह कार डिटेलिंग सोल्यूशन “टीग्लॉस” चे अनावरण
आपल्या ‘ग्राहक-प्रथम’ संस्कृतीच्या अनुषंगाने, टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रायव्हेट लिमिटेड (टीकेएम) ने आज आपला रिव्होल्यूशनरी कार केअर ब्रँड, “टीग्लॉस” लॉन्च करण्याची घोषणा केली, ज्याने कार डिटेलिंगच्या जगात ब्रँडचा प्रवेश केला आहे. भारतातील ग्राहकांमधील उच्च दर्जाच्या आणि विश्वासार्ह कार डिटेलिंग सेवांच्या वेगाने वाढणाऱ्या मागणीला प्रतिसाद देत, टीकेएम टोयोटा वाहनांसाठी विशेषत: तयार केलेल्या सर्वसमावेशक सोल्यूशन्ससह कार केअर इंडस्ट्रीला पुन्हा परिभाषित करण्यासाठी सज्ज आहे.
“टीग्लॉस” कार केअर सेवा भारतातील प्रत्येक अधिकृत टोयोटा डीलरशिपवर 1 मे 2024 पासून दिले जातील. हे ग्राहकांना मालकीचा आनंददायी अनुभव सुनिश्चित करून, व्यावसायिक पद्धतीने दर्जेदार कार केअर सोल्यूशन्समध्ये सोयीस्कर प्रवेश देते.
“टीग्लॉस” ब्रँड अंतर्गत, कार निर्माता उद्योगात प्रथमच, टीकेएम वाहनाचे आतील आणि बाहेरील सौंदर्य वाढवण्यासाठी सेवांची विस्तृत श्रेणी ऑफर करेल. यामध्ये सिरॅमिक कोटिंग, अंडरबॉडी कोटिंग, सायलेन्सर कोटिंग आणि इंटीरियर पॅनेल प्रोटेक्शन समाविष्ट आहे. या कार केअरचा उद्देश केवळ वाहनांचे सौंदर्यात्मक आकर्षण वाढवणे नाही तर पर्यावरणीय घटकांपासून काही प्रमाणात संरक्षण करणे देखील आहे.
ग्राहक आतील सुधारणा आणि बाह्य सुशोभीकरण सेवा यांसारख्या सर्वसमावेशक सेवांचा देखील लाभ घेऊ शकतात. या सेवा कार ला नवीन जीवन देतात, कारचे सौंदर्यात्मक आकर्षण वाढवतात आणि ती कार नवीन असल्यासारखीच दिसते याची खात्री करतात. याव्यतिरिक्त, प्रवाशांच्या हितासाठी, “टीग्लॉस” सेवा एसी डक्ट क्लीनिंग आणि बाष्पीभवक साफसफाईसह पृष्ठभागाच्या पलीकडे जातात, एक उत्साहपूर्ण वातावरणास निर्माण करतात, आरोग्यदायी ड्रायव्हिंग वातावरणास प्रोत्साहन देतात. टोयोटा वाहनांच्या मालकांना अभिमान आणि समाधानाची नवीन भावना देऊन, वाहनांच्या अंतर्गत आणि बाह्य भागांना नवसंजीवनी देण्यासाठी सर्व सेवा काळजीपूर्वक तयार केल्या आहेत.
श्री सबरी मनोहर – वाईस प्रेसिडेंट, सेल्स-सर्व्हिस-युज्ड कार बिझनेस, टोयोटा किर्लोस्कर मोटर या उपक्रमावर बोलताना म्हणाले, “टोयोटा किर्लोस्कर मोटरची ‘ग्राहक-प्रथम’ तत्त्वज्ञानाशी अतूट बांधिलकी अधोरेखित करणारा एक नाविन्यपूर्ण आणि उद्योगातील पहिला उपक्रम “टीग्लॉस” चे अनावरण करताना आम्हाला आनंद होत आहे. दर्जेदार वाहन मेंटेनन्सला प्राधान्य देणाऱ्या कार मालकांमध्ये आम्ही वाढता कल पाहत आहोत आणि ” टीग्लॉस ” ची रचना त्यांच्या कारला सौंदर्याच्या दृष्टीने उत्कृष्ट स्थितीत ठेवण्यास मदत करून त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तयार केले आहे.
“टीग्लॉस” हे वन-स्टॉप-शॉप सोल्यूशन आहे ज्याचा उद्देश ग्राहकांना वाहनांची सुरक्षा आणि देखभाल सुनिश्चित करण्यासाठी विशेषतः टोयोटा वाहनांसाठी तयार केलेली उच्च दर्जाची कार केअर सोल्यूशन्स ऑफर करणे आहे, जे शेवटी शांततापूर्ण मालकी अनुभव देण्यासाठी डिझाइन केलेले आहे. हे लॉन्चिंग टोयोटा वाहनांच्या मालकांना सर्वसमावेशक कार केअर सोल्यूशन प्रदान करण्याच्या आमच्या प्रवासातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा आहे जे गुणवत्ता, टिकाऊपणा आणि विश्वासार्हता (क्यूडीआर) या आमच्या मूळ मूल्यांशी संरेखित आहे.”
त्याच्या विस्तृत सेवा ऑफर व्यतिरिक्त, “टीग्लॉस” ग्राहकांच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी कस्टमायझेशन आणि लवचिकतेवर भर देईल. उच्च-गुणवत्तेच्या सामग्रीचा केवळ वापरच नव्हे तर वाहनाच्या सौंदर्याचे दीर्घायुष्य सुनिश्चित करण्यासाठी, बाह्य आणि आतील भागांसह सेवा अत्यंत व्यावसायिक पद्धतीने दिल्या जातील याची खात्री करण्यासाठी अत्यंत कुशल आणि प्रशिक्षित व्यावसायिकांकडून सेवा घेतल्या जातील.
गेल्या काही वर्षांमध्ये, टीकेएम ने संपूर्ण खरेदी आणि मालकी चक्रात ग्राहकांच्या अनुभवांमध्ये सातत्याने सुधारणा करण्याचा प्रयत्न केला आहे ज्यात मूल्यवर्धित सेवांद्वारे वेळेवर आणि संबंधित उपक्रम राबवून नव्याने सादर करण्यात आलेल्या “अप्रतिम न्यू कार डिलिव्हरी सोल्यूशन”, 5-वर्षांच्या मोफत रोडसाइड असिस्टन्सचा समावेश आहे. आमच्या सध्याच्या ग्राहकांना मालकीचा आनंददायी अनुभव सुनिश्चित करून, टोयोटा वाहन खरेदी करण्याचे स्वप्न प्रत्यक्षात आणणे हा कार्यक्रम आणि विशेष योजनांचा उद्देश आहे.