
no images were found
टोयोटा किर्लोस्कर मोटरने नवीन इनोव्हा हायक्रॉस पेट्रोल जीएक्स (ओ) ग्रेड लॉन्च केला
बेंगळुरू: – आपल्या ‘ग्राहक-प्रथम’ संस्कृतीच्या अनुषंगाने आणि त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, टोयोटा किर्लोस्कर मोटर (टीकेएम) ने आज इनोव्हा हायक्रॉस द जीएक्स (ओ) पेट्रोल व्हेरियंटमध्ये नवीन ग्रेड लॉन्च केल्याची घोषणा केली. लेटेस्ट इनोव्हा हायक्रॉस लाइन-अपमध्ये, 10 हून अधिक अॅडव्हान्स टेक्नॉलॉजी आणि आरामदायी फीचर्स आहेत. हि फीचर्स शोधत असलेल्या ग्राहकांसाठी इनोव्हा हायक्रॉस द जीएक्स (ओ) योग्य आहे. इनोव्हा हायक्रॉस द जीएक्स (ओ) ग्रेडची बुकिंग आधीच सुरू झाली असून 15 एप्रिल 2024 पासून डिलिव्हरी सुरू होण्याची अपेक्षा आहे.
इनोव्हा हायक्रॉस पेट्रोल जीएक्स (ओ) पेट्रोल व्हेरियंटचे प्रमुख फीचर्स खालीलप्रमाणे आहेत:
- रीएनर्जिज्ड एक्सटीरियर – फ्रंट एलईडी फॉग लॅम्प, फ्रंट आणि रिअर पार्किंग सेन्सर्स, रिअर डीफॉगर
- सुपीरियर कम्फर्ट – चेस्टनट थीम असलेली इंटिरिअर्स, डॅशबोर्ड आणि डोअर पॅनल्समध्ये सॉफ्ट टच मटेरियल, मिड-ग्रेड फॅब्रिक सीट्स आणि रिअर सनशेड*
- उत्तम सुविधा – ऑटो एसी, 10.1″ इंफोटेनमेंट सिस्टम*, वायरलेस ऍपल कारप्ले, पॅनोरॅमिक व्ह्यू मॉनिटर
7- आणि 8-सीटर पर्याय असलेले, जीएक्स (ओ) ग्रेड – ब्लॅकिश अगेहा ग्लास फ्लेक, प्लॅटिनम व्हाइट पर्ल, अॅटिट्यूड ब्लॅक मीका, स्पार्कलिंग ब्लॅक पर्ल क्रिस्टल शाइन, सिल्व्हर मेटॅलिक, सुपर व्हाइट आणि अवंत गार्डे ब्रॉन्झ मेटॅलिक या सात डायनॅमिक कलर मध्ये उपलब्ध आहे.
श्री. साबरी मनोहर, वाइस प्रेसिडेंट, सेल्स-सर्विस-यूज्ड कार बिजनेस, टोयोटा किर्लोस्कर मोटर नवीन जीएक्स (ओ) ग्रेड वर बोलतांना म्हणाले, “टीकेएममध्ये, ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन आम्ही ऑफर करत असलेले प्रत्येक वाहन आमच्या ग्राहकांच्या वाढत्या गरजा पूर्ण करत असल्याचे सुनिश्चित करतो. नवीन इनोव्हा हायक्रॉस पेट्रोल जी एक्स (ओ) ग्रेड या तत्वज्ञानाचा पुरावा आहे जे लक्झरी आणि कार्यक्षमतेचे मिश्रण करून उत्तम आरामदायी आणि अॅडव्हान्स टेक्नॉलॉजी देते. उच्च परफॉर्मन्ससह, जी एक्स (ओ) ग्रेड चे 10 हून अधिक फीचर्स त्यांच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्याच्या उद्देशाने, आकर्षक ऑफरसह पूर्णपणे लोड केलेल्या पेट्रोल व्हेरियंटच्या शोधात असलेल्या ग्राहकांना प्रभावित करतील अशी अपेक्षा आहे.
शिवाय, केवळ इनोव्हा हायक्रॉसलाच नव्हे तर आमच्या संपूर्ण उत्पादन पोर्टफोलिओला मिळालेल्या जबरदस्त प्रतिसादाबद्दल आम्ही आमच्या ग्राहकांचे आभार मानतो. ग्राहक-प्रथम दृष्टिकोनाची आमची वचनबद्धता आम्हाला भविष्यात नाविन्यपूर्ण उत्पादने आणि सेवांच्या निर्मितीसाठी प्रेरित करत राहील.”