Home सामाजिक  “मुद्रा ए कल्चरल इनिशेटीव्ह” अंतर्गत पुण्यह डान्स कंपनीज प्रस्तुत “संजीवनी” या ९० मिनिटाच्या भरतनाट्यम कार्यक्रमाचे आयोजन

 “मुद्रा ए कल्चरल इनिशेटीव्ह” अंतर्गत पुण्यह डान्स कंपनीज प्रस्तुत “संजीवनी” या ९० मिनिटाच्या भरतनाट्यम कार्यक्रमाचे आयोजन

2 second read
0
0
38

no images were found

 “मुद्रा ए कल्चरल इनिशेटीव्ह” अंतर्गत पुण्यह डान्स कंपनीज प्रस्तुत “संजीवनी” या ९० मिनिटाच्या भरतनाट्यम कार्यक्रमाचे आयोजन

कोल्हापूर/प्रतिनिधी : १६ एप्रिल २०२४ रोजी रोटरी क्लब ऑफ गार्गीजच्या वतीने “मुद्रा ए कल्चरल इनिशेटीव्ह” अंतर्गत पुण्यह डान्स कंपनीज प्रस्तुत “संजीवनी” या ९० मिनिटाच्या भरतनाट्यम कार्यक्रमाचे प्रथमच आयोजन करण्यात आले आहे.हा कार्यक्रम केशवराव भोसले नाट्यगृह येथे सायंकाळी ६ वाजता सुरू होणार आहे अशी माहिती प्रेसिडेंट रो.कल्पना घाटगे,सेक्रेटरी शोभा तावडे, ट्रेजरर ममता झंवर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
रोटरी क्लब ने आतापर्यंत सामाजिक बांधिलकी जपत अनेक वेगवेगळे विधायक उपक्रम राबविले आहेत. या उपक्रमाचाच एक भाग म्हणून येत्या १६ एप्रिल २०२४ रोजी हा ९० मिनिटांचा न थांबता भरतनाट्यमचे आदित्य पी.व्ही आणि पार्श्वनाथ उपाध्ये यांच्या ग्रुपचे सादरीकरण कार्यक्रम होणार आहे.मेनन ड्रीवेन बाय टेक्नॉलॉजी याचे सहकार्य कार्यक्रमाला लाभले आहे.या कार्यक्रमाचे पासेस चार दिवस आधीपासून केशवराव भोसले नाट्यगृह येथे उपलब्ध असणार आहेत तर महाजन पब्लिसिटी ९५६१६२६६६३ यांच्याकडेही पासेस मिळणार आहेत.
रोटरी क्लब ऑफ गार्गिजने अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत.कोरोनाच्या कालावधीतही सहकार्य केले आहे.आताही भरतनाट्यम उपक्रम राबविला जात आहे.या कार्यक्रमात एकूण ७ जण नृत्याविष्काराचे सादरीकरण करणार आहेत. ज्यात राम आणि सीता,दीपावली,नृत्य संजीवनी,पुण्य कृष्ण,आदी शंकराचार्य,कृष्णलीला, नामसंजीवनी,भजन आणि श्रीराम यांच्यावर आधारित नृत्यांचा समावेश असणार आहे.असे कविता नायर यांनी सांगितले.

भरतनाट्यम विषयी माहिती

या नृत्य पद्धतीवर द्रविड संस्कृतीचा प्रभाव आहे. यात मृदंगम,तालम,वीणा,बासरी ,घटम आदि वाद्यांची साथसंगत असते. भरतनाट्यम हे भारतीय शास्त्रीय नृत्य आहे ज्याचा उगम दक्षिण भारतातील तमिळनाडूच्या हिंदू मंदिरांमध्ये झाला आहे. भरतनाट्यम नृत्य ही भारतीय इतिहास आणि संस्कृतीत रुजलेली परंपरा आहे.आज, भरतनाट्यम ही एक नृत्यशैली आहे ज्यामध्ये धार्मिक आणि गैर-धार्मिक थीम, तसेच फ्यूजन शैलींचा समावेश आहे.भरतनाट्यमचा इतिहास हा या कला प्रकारातील लवचिकता आणि अनुकूलतेचा पुरावा आहे. भरतनाट्यमचा उगम नाट्यशास्त्र या मजकुरातून झाला आणि धार्मिक अनुभव अधिक सखोल करण्याच्या उद्देशाने मंदिरांमध्ये रुजला.भरतनाट्यमचा इतिहास
भरतनाट्यमचा इतिहास हा या कला प्रकारातील लवचिकता आणि अनुकूलतेचा पुरावा आहे. भरतनाट्यमचा उगम नाट्यशास्त्र या मजकुरातून झाला आणि धार्मिक अनुभव अधिक सखोल करण्याच्या उद्देशाने मंदिरांमध्ये रुजला. मंदिराच्या धार्मिक विधींमधून त्याच्या पवित्र उत्पत्तीपासून ते एक आदरणीय शास्त्रीय नृत्य म्हणून पुनरुत्थान होईपर्यंत, भरतनाट्यम आपल्या सौंदर्य, कृपा आणि गहन कथाकथनाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करत आहे. हा भारताच्या सांस्कृतिक वारशाचा एक अविभाज्य भाग आहे, ज्यामध्ये भूमीच्या समृद्ध परंपरा आणि कलात्मक अभिव्यक्ती आहेत.अधिकाधिक विद्यार्थ्यांनी अभ्यास सुरू केल्यामुळे ही आदरणीय शास्त्रीय नृत्यशैली लोकप्रिय होत गेली. आज, भरतनाट्यम नृत्य संपूर्ण भारतात, तसेच परदेशात सादर केले जाते. आणि साजरे केले जाते आणि सर्वात प्रमुख भारतीय नृत्यांपैकी एक म्हणून ओळखले जाते.

सचिन मेनन यांचे मोलाचे सहकार्य मिळाले आहे.

विक्री आणि चॅनेल व्यवस्थापनाचा प्रचंड अनुभव असलेले एक दृढ ग्राहक-केंद्रित व्यावसायिक. विशिष्ट आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञान उपाय शोधण्यात संस्थांना मदत करण्यासाठी सल्लागार दृष्टीकोन घेण्यात सचिन मेनन माहिर आहेत . वारंवार बदलत्या बाजारपेठांमध्ये शाश्वत व्यवसाय आणि महसुलात वाढ त्यांनी केली आहे. त्यांचा अनुभव मध्य-पूर्व, आफ्रिका आणि भारतात पसरलेला आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी ग्राहकांमध्ये प्रबोधन आवश्यक   – पालकमंत्री प्रकाश आबिटकर 

ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी ग्राहकांमध्ये प्रबोधन आवश्यक   – पालकमंत्री प्रका…