Home शैक्षणिक पितळी गणपती येथील एम्पायर टॉवरमधील ई- लायब्ररी  सुरु

पितळी गणपती येथील एम्पायर टॉवरमधील ई- लायब्ररी  सुरु

10 second read
0
0
35

no images were found

पितळी गणपती येथील एम्पायर टॉवरमधील ई- लायब्ररी  सुरु

कोल्हापूर  : महानगरपालिकेने स्वनिधीतून ताराबाई पार्क पितळी गणपती येथील एम्पायर टॉवर येथे ई- लायब्ररी साकारण्यात आली आहे. गोरगरीब होतकरु व गरजू विद्यार्थ्यांसाठी ही हि ई लायब्ररी सोमवार, दिनांक ८ एप्रिल २०२४ पासून सुरु होत आहे. या ई लायब्ररीमध्ये विद्यार्थ्यांना वायफाय सुविधा व अभ्यासिकेची सोय करण्यात आलेली आहे.  हि लायब्ररी सकाळी ७ ते दुपारी २ व दुपारी २ ते रात्रौ ९ अशा दोन शिप्टमध्ये सुरु ठेवण्यात येणार आहे. या ई लायब्ररीमध्ये अभ्यासिकेची क्षमता ४० असून सकाळच्या शिफ्टमध्ये ४० विद्यार्थ्यांना तसेच दुपारच्या शिष्टमध्ये ४० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. या ठिकाणी एकदा प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शिफ्ट बदलून दिली जाणार नाही.

           ई लायब्ररीसाठी एक महिना, दोन महिने, तीन महीने, सहा महिने तसेच वार्षिक सभासदत्व देण्यात येणार आहे. यासाठी प्रवेश फी रु.५०/- आणि मासिक रुपये ४००/- इतकी सभासदत्व फी आकारण्यात येणार आहे. विविध स्पर्धा परीक्षा देणा-या तसेच लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देण्या-या गोरगरीब होतकरु व गरजू विद्यार्थ्यांसाठी ही एक पर्वणी असून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

मुख्य इमारतीमधील नागरी सुविधा केंद्र देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे पाच दिवस बंद छत्रपती शिव…