Home राजकीय महाराष्ट्रातील उमेदवार जाहीर करा; अमित शाहा

महाराष्ट्रातील उमेदवार जाहीर करा; अमित शाहा

0 second read
0
0
20

no images were found

महाराष्ट्रातील उमेदवार जाहीर करा; अमित शाहा

 महायुतीमधील जागावाटपावरुन चर्चा सुरु असतानाच अमित शाहांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या तारखांची घोषणा होण्याच्या एक दिवस आधीच महाविकास आघाडीमधील पक्षांना एक खोचक सल्ला दिला आहे.
देशातील लोकसभा निवडणुकींच्या तारखांची आज घोषणा होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने दुपारी 3 वाजता आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे. मात्र त्यापूर्वीच भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रातील 20 जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपा वगळता महाराष्ट्रातील एकाही पक्षाने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही. महायुतीमधील एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार गट भाजपाबरोबर जागांसंदर्भातील वाटाघाटी करत आहे. केंद्रीय मंत्री अमित शाहांबरोबर जागावाटपावर चर्चा करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासहीत हे दोन्ही नेते दोनवेळा दिल्लीला जाऊन आले आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडीमधील जागावाटपही पूर्ण झाल्याचा दावा नेत्यांकडून केला जात असून 17 मार्च रोजी उमेदवारांची यादी जाहीर होईल असं सांगण्यात आलं आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता अमित शाहांनी महाविकास आघाडीला एक खोचक सल्ला दिला आहे.
महाराष्ट्रातील स्थानिक जाणकारांच्या अंदाजानुसार शरद पवार तसेच उद्धव ठाकरेंना सहानुभूतीचा फायदा मिळू शकतो. सध्याची तेथील युती किती चांगली कामगिरी करेल याबद्दल तुम्हाला किती विश्वास आहे? असा प्रश्न शाहांना विचारला गेला. अमित शाहांनी या प्रश्नाला उत्तर देताना तिन्ही पक्षांमध्ये जागावाटपाची चर्चा पूर्ण झाल्याचं सांगितलं. “एनडीएच्या तिन्ही घटक पक्षांमध्ये अगदी नावासहीत जागावाटप निश्चित झालं आहे. कोणताही वाद होणार नाही,” असं अमित शाह म्हणाले.अमित शाह इतक्यावरच थांबले नाही तर त्यांनी जागावाटपाच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडीला टोलाही लागवाला. वाद होईल असं मानून ‘इंडिया’ आघाडी आपले उमेदवार जाहीर करत नसेल तर त्यांनी ते लवकरच घोषित करावे .

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…