no images were found
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करा
कोल्हापूर : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.), मुंबई व राष्ट्रीय अनुसुचित जाती वित्त विकास महामंडळ, दिल्ली यांच्यामार्फत मांग, मातंग, मिनी-मादीग, मादींग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गोराडी, मादगी व मादिगा या जातीतील दरिद्रय रेषेखालील व गरजू घटकांच्या आर्थिक उन्नतीसाठी, तसेच त्यांना स्वंयरोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करुन देण्यासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. या कर्ज योजनांचा लाभ घेण्यासाठी 7 फेब्रुवारी 2024 पासून सुरुवात करण्यात आली आहे. इच्छुक लाभार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज 11 मार्च 2024 पर्यंत https://beta.slasdc.org या संकेतस्थळावर सादर करावेत, असे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक आर.एच. चव्हाण यांनी केले आहे.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.), मुंबई व राष्ट्रीय अनुसुचित जाती वित्त विकास महामंडळ, दिल्ली यांच्यामार्फत सुविधा कर्ज योजना-कर्ज मर्यादा रक्कम रु. ५ लाख, लघु ऋण वित्त योजना- कर्ज मर्यादा रक्कम रु.१.४० लाख, महिला समृध्दी योजना-कर्ज मर्यादा- १.४० लाख व शैक्षणिक कर्ज योजना-कर्ज
मर्यादा देशांतंर्गत अभ्यासक्रमासाठी- रक्कम रु. ३० लाख व परदेशातील अभ्यासक्रमासाठी रक्कम रु. ४० लाख याप्रमाणे योजना सुरु करण्यात येणार असून त्यानुसार जिल्हा कार्यालयांना उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. या योजनांची माहिती महामंडळाच्या slasdc.org या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.