Home सामाजिक दुग्धव्यवसायातील महिलांचा सन्मान

दुग्धव्यवसायातील महिलांचा सन्मान

10 second read
0
0
39

no images were found

दुग्धव्यवसायातील महिलांचा सन्मान

 

भारतातील आघाडीच्या एनबीएफसी पैकी एक, एसएमएफजी  इंडिया क्रेडिट कंपनी लिमिटेड ने त्यांच्या ६ व्या पशु विकास दिवशी  (पीव्हीडी), सर्वात मोठे एकदिवसीय पशुविकास शिबिर आयोजित केले. ही शिबिरे १४ राज्यांमधील ४६० हून अधिक ठिकाणी एकाच वेळी आयोजित करण्यात आली आणि १ लाखांहून अधिक गुरांना आवश्यक आरोग्य सेवा पुरवण्यात आली.भारतात, ८ कोटींहून अधिक कुटुंबे थेट दुग्धव्यवसायाशी निगडीत आहेत आणि या क्षेत्राच्या कार्यशक्ती मध्ये स्त्रियांचे प्रमाण ७०% आहे. या महिलांच्या प्रयत्नांचे स्मरण करण्यासाठी ६ वा पशु विकास दिन ‘दुग्ध व्यवसायातील महिला’ म्हणून साजरा करण्यात आला. स्त्री पुरुष समानता आणि सामाजिक उन्नती साधण्यासाठी सर्वांचा सहभाग यावर भर देत हा उपक्रम ईएसजी चौकटीमधील ‘सामाजिक’ पैलू प्रतिबिंबित करतो.पशु निगा आणि उपचार यांच्या जोडीला एसएमएफजी  इंडिया क्रेडिटने ३०,००० हून अधिक लोकांना लाभ मिळवून देत ४-१० फेब्रुवारी दरम्यान देशभरात ३०० हून अधिक आरोग्य शिबिरांचे आयोजन केले. ६ व्या पशु विकास दिवसाने १,२५,००० हून अधिक जीवनांना स्पर्श केला आणि त्यांच्यावर प्रभाव पाडला.

कंपनीच्या सामाजिक उपक्रमांबद्दल बोलताना, एसएमएफजी  इंडिया क्रेडिट कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. शंतनू मित्रा म्हणाले, “आमच्या ग्रामीण भागातील ग्राहकांपैकी ९०% हून अधिक ग्राहक या महिला आहेत. आमचे बरेच ग्राहक त्यांच्यासाठी उत्पन्नाचा एक मोठा स्रोत असलेल्या गुरे खरेदीसाठी कर्ज घेतात. आमचे समाज विकास कार्यक्रम बदलासाठी चालना देणारे घटक म्हणून काम करतात आणि ग्रामीण जीवनमान उंचावण्यावर, जीवनाची एकूण गुणवत्ता वाढवण्यावर आणि उत्पन्नाच्या प्रवाहांना चालना देण्यावर लक्ष केंद्रित करतात. पशुधन कल्याणाच्या पलीकडे आणि सेवा देत असलेल्या समुदायांच्या सर्वांगीण कल्याणासाठी कौशल्य विकास आणि आर्थिक साक्षरतेला सक्रियपणे प्रोत्साहन देत आहोत. एसएमएफजी  इंडिया क्रेडिट कंपनी मध्ये आम्ही नाविन्यपूर्ण आणि शाश्वत सामाजिक-आर्थिक उपक्रमांद्वारे वंचित  समाजामध्ये सर्वसमावेशक वाढीस प्रोत्साहन देऊन आमच्या ग्राहकांशी मजबूत संपर्क प्रस्थापित करण्यासाठी समर्पित आहोत.

पशु विकास दिनावर भाष्य करताना एसएमएफजी  इंडिया क्रेडिट कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री स्वामीनाथन सुब्रमण्यन म्हणाले, “एसएमएफजी  इंडिया क्रेडिटमध्ये आम्ही ग्रामीण विकास आणि मजबूत सामाजिक उपक्रमांना प्रोत्साहन देण्याच्या आमच्या बांधिलकीबाबत ठाम आहोत. सर्वसमावेशक कार्यक्रम आणि एकसंधपणे काम करणारे वैविध्यपूर्ण कर्मचारी यांच्या माध्यमातून ईएसजीच्या ‘सामाजिक’ पैलूचा उपयोग करण्याची आमची इच्छा आहे. ग्रामीण भागातील गुरेढोरे आणि त्यांच्या मालकांच्या विशिष्ट आरोग्यसेवा लक्षात घेऊन हा पशु विकास दिन आयोजित केला आहे. हा कार्यक्रम पशुपालकांच्या आकांक्षांना सामर्थ्य देतो आणि पशुधन उत्पादकता वाढवण्यावर लक्ष केंद्रित करतो.”

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन   कोल्हापूर,(प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठात शि…