Home राजकीय मुख्यमंत्र्यांनी टाळली संभाजीराजेंची भेट, दीड तास दालनाबाहेर ताटकाळत थांबून परतले!

मुख्यमंत्र्यांनी टाळली संभाजीराजेंची भेट, दीड तास दालनाबाहेर ताटकाळत थांबून परतले!

0 second read
0
0
101

no images were found

मुख्यमंत्र्यांनी टाळली संभाजीराजेंची भेट, दीड तास दालनाबाहेर ताटकाळत थांबून परतले!

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्यावर संभाजीराजे हे चर्चा करण्यासाठी  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्या करिता मंत्रालयात आले होते, मात्र मुख्यमंत्र्यांनी छत्रपती संभाजीराजेंची भेट टाळली असल्याची माहिती समोर आली आहे. तब्बल दीड तास संभाजीराजे यांना मुख्यमंत्र्यांच्या दालनाबाहेर ताटकाळत उभे राहावे लागले होते.

मराठा समाजाच्या प्रश्नांच्या पाठपुराव्यासाठी आज छत्रपती संभाजीराजे मंत्रालय येथे आले होते. संभाजीराजे यांनी सामान्य प्रशासन विभागाचे सचिव सुमंत भांगे यांची भेट घेतली आणि आढावा घेतला. त्यानंतर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनाकडे गेले. यावेळी छत्रपती संभाजीराजे यांच्यासह मराठा समाजाचे समन्वयक आणि समाजाचे प्रतिनिधी देखील उपस्थित होते.

मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तब्बल दीड ते दोन तास छत्रपती संभाजीराजे यांची भेट टाळली. या कालावधीत ते पक्ष प्रवेशासाठी आलेल्या नेत्यांच्या गाठीभेटी घेत राहिले पण समाजाचे प्रश्न घेऊन आलेल्या संभाजीराजे यांना वारंवार निरोप देऊनही ताटकळत राहावे लागले. या प्रकारानंतर छत्रपती संभाजीराजे मुख्यमंत्री कार्यालयातून तडकाफडकी निघून गेले, अशी माहिती समोर आली आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

आरोग्य सेवा आयुक्त काटकर यांची गारगोटी उपजिल्हा रुग्णालयास भेट: विभागीय आढावा बैठक सं…