no images were found
सुकन्या समृद्धी योजनेच्या लाभार्थ्यांना मोदी सरकारची नव वर्षातील मोठं गिफ्ट ?
नवी दिल्ली : केंद्र सरकारने नवीन वर्षाच्या आधी देशवासियांना मोठं गिफ्ट दिलं आहे. केंद्र सरकारने जानेवारी 2024 मध्ये काही योजनांचे व्याजदर वाढवले आहेत. तीन वर्षांच्या मुदत ठेवीसारख्या लहान बचत योजनांच्या व्याजदरामध्ये मोठी वाढ केलीये. केंद्र सरकारने सुकन्या समृद्धी योजना आणि तीन वर्षांच्य मुदत ठेवी योजनांच्या व्याजदरात वाढ केली आहे. यामधील लहान बचत योजनांमध्ये व्याजदर कायम ठेवण्यात आले आहेत.
केंद्र सरकारने सुकन्या समृद्धी योजनेचा आणि तीन वर्षांच्या मुदत ठेवीचा व्याजदर वाढवला आहे. याआधी सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर हा 8 टक्के आहे. तर तीन वर्षांच्या टीडीचा व्याजदर हे 7.1 टक्के होते.सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी या योजनेच्या व्याजदरात दरात गेल्या तीन वर्षांपासून कोणताही बदल करण्यात आला नाही.
PPF व्याजातील शेवटचा बदल एप्रिल-जून 2020 मध्ये झाला होता. त्यावेळी या व्याजाच्या दरात घट करण्यात आली होती. हा व्याजदर 7.9 टक्क्यांवरून 7.1 टक्के करण्यात आला आहे. गेल्यावेळी केंद्र सरकारने पंचवार्षिक आरडी योजनेतही बदल केला नव्हता.या योजनांच्या व्याजामध्ये बदल नाही.
दरम्यान, जानेवारी मार्च 2024 या तिमाहीसाठी फक्त सुकन्या समृद्धी योजनेच्या व्याजात आणि तीन वर्षांच्या मुदतींच्या ठेवीमध्ये वाढ करण्यात आली आहे. बाकी सर्व लहान बचत योजनांमध्ये कोणताही बदल केला नाही. पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट या योजनेवरील व्याज हे बँक एफडीपेक्षा जास्त आहे.