no images were found
कपड्यांच्या भन्नाट स्टाइलमुळे सई ताम्हणकर पुन्हा चर्चेत!
नुकतंच सईने सोशल मीडियावर नवे फोटो पोस्ट केले आहेत. यावेळी तिच्या हटके फॅशनवर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.अभिनेत्री सई ताम्हणकर अभिनयासह आपल्या फॅशनसेन्ससाठीही तितकीच लोकप्रिय आह. ऊसवेगवेगळ्या फोटोशूटमधील फोटो ती आपल्या चाहत्यांबरोबर शेअर करत आहे.या फॅशनमुळे तिचं कौतुक होतं, त्याचबरोबर तिला अनेकदा ट्रोलिंगला सामोरंही जावं लागलं आहे.
नुकतंच सईने सोशल मीडियावर नवे फोटो पोस्ट केले आहेत. यावेळी तिच्या हटके फॅशनवर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.सईने यावेळी आकाशी रंगाचं सॅटीन शर्ट घातलंय, त्यावर तिने डेनिम शॉर्ट स्कर्ट घातला आहे.
शर्टच्या आत तिने काळ्या रंगाची ब्रालेट घातली आहे. यावेळी तिने पोनीटेल हेअरस्टाइल केली आहे.तिने गळ्यामध्ये चांदीच्या रंगाची चैन घातली असून ग्लॅमरस मेकअप केला आहे.
दरम्यान, सईच्या या फोटोंवर चाहत्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.एका नेटकऱ्याने सईची तुलना थेट उर्फी जावेद बरोबर केली आहे. यावर एक चाहत्याने त्याचा चांगलाच समाचार घेतला, तर दुसऱ्या नेटकऱ्याने त्याच्या त्या कमेंटवर समर्थन दर्शवले.तर एका चाहत्याने सईचे कौतुक करत म्हटलंय की, ‘तू कसेही कपडे घाल, तुला छानच दिसतात. तू सर्व कपडे छान कॅरी करतेस.’