Home मनोरंजन कलाकारांनी सांगितले नववर्ष स्‍वागताबाबतच्‍या त्‍यांच्‍या योजना!

कलाकारांनी सांगितले नववर्ष स्‍वागताबाबतच्‍या त्‍यांच्‍या योजना!

3 min read
0
0
41

no images were found

कलाकारांनी सांगितले नववर्ष स्‍वागताबाबतच्‍या त्‍यांच्‍या योजना!

सर्वजण वर्ष २०२३ चा निरोप घेण्‍यासह उत्‍साहात नववर्ष २०२४ चे स्‍वागत करण्‍यास उत्‍सुक आहेत. एण्‍ड टीव्‍हीवरील कलाकार देखील त्‍यांच्‍या प्रियजनांसोबत नववर्षाचे उत्‍साहात स्‍वागत करण्‍याची तयारी करत आहेत आणि त्‍यांच्‍या योजनांबाबत सांगत आहेत. हे कलाकार आहेत मालिका अटल मधील आशुतोष कुलकर्णी (कृष्‍णन बिहारी वाजपेयी) व नेहा जोशी (कृष्‍णा देवी वाजपेयी), मालिका  हप्‍पू की उलटन पलटन  मधील योगेश त्रिपाठी (दरोगा हप्‍पू सिंग) व गीतांजली मिश्रा (राजेश), मालिका  भाबीजी घर पर है मधील शुभांगी अत्रे (अंगूरी भाबी) व रोहिताश्‍व गौड (मनमोहन तिवारी).

मालिका  अटल मध्‍ये कृष्‍णन बिहारी वाजपेयीची भूमिका साकारणारे आशुतोष कुलकर्णी म्‍हणाले,  नववर्ष माझ्यामध्‍ये उत्‍साह जागृत करतो. मी माझे प्रियजण व लाडक्‍या कुटुंबियांसोबत नववर्ष स्‍वागताचा आनंद घेतो. आम्‍ही नववर्षाच्‍या पूर्वसंध्‍येला रेस्‍टॉरंटमध्‍ये डिनरचा आस्‍वाद घेणार आहोत. मी त्‍या उत्‍साहपूर्ण क्षणांचा आनंद घेण्‍यास उत्‍सुक आहे. मध्‍यरात्रीचे १२ वाजताच मी कुटुंबियांचे प्रेम व आनंदासह धमाल क्षणांचा अनुभव मिळण्‍याची अपेक्षा करतो. नववर्षाच्‍या पहाटेला जवळच्‍या प्रसिद्ध मंदिरामध्‍ये जाणार आहे. तेथे जाऊन नववर्षासाठी प्रार्थना करणे ही माझ्यासाठी हृदयस्‍पर्शी परंपरा बनली आहे, सर्वांना नववर्ष प्रेम, समृद्धता व आशीर्वादाने भरलेले असो हीच सदिच्‍छा! 

मालिका  हप्‍पू की उलटन पलटन मध्‍ये राजेश सिंगची भूमिका साकारणाऱ्या गीतांजली मिश्रा म्‍हणाल्‍या, आम्‍ही लोणावळा येथे जाऊन तेथील हिरवळीमधून साहसी हाइक्‍सचा आनंद घेणार आहोत,  या व्‍यतिरिक्‍त, आम्‍ही काही वेळ आराम करणार आहोत, जवळच्‍या स्‍पा मध्‍ये जाऊन स्‍वत:ला नववर्षासाठी उत्‍साहित करणार आहोत. यंआम्‍ही लोणावळाच्‍या नयनरम्‍य आकर्षकतेमध्‍ये सामावून जात दीर्घकालीन आठवणी तयार करणार आहोत आणि जल्‍लोषात व उत्‍साहात नववर्षाचे स्‍वागत करणार आहोत. तसेच अविश्‍वसनीय नववर्षाची संस्‍मरणीय सुरूवात करण्‍यास उत्‍सुक आहोत. 

मालिका  भाबीजी घर पर है मध्‍ये अंगूरी भाबीची भूमिका साकारणाऱ्या शुभांगी अत्रे म्‍हणाल्‍या, माळशेज घाटातील माझ्या फार्महाऊसच्‍या अवतीभोवती नयनरम्‍य स्‍थळे व उत्‍साहवर्धक वातावरण पाहायला मिळते. ज्‍यामुळे माझ्या मनात निसर्गामध्‍ये सामावून जाण्‍याची भावना निर्माण होते. मी हिरवळीमधून फेरफटका मारणार आहे,  सरत्‍या वर्षासह मी माझ्या अवतीभोवती असलेल्‍या सौंदर्याचे आभार व्‍यक्‍त करते, तसेच नववर्षामध्‍ये उत्तम संधी मिळण्‍याची आशा करते. मी निसर्गामध्‍ये सामावून जात, तेथील सौंदर्याचा आनंद घेत नववर्षाचे उत्‍साहात व जल्‍लोषात स्‍वागत करणार आहे. सर्वांना आनंददायी सरप्राइजेजसह आनंदमय, समृद्ध वर्षाच्‍या शुभेच्‍छा!

मालिका  अटल मध्‍ये कृष्‍णा देवी वाजपेयीची भूमिका साकारणाऱ्या नेहा जोशी म्‍हणाल्‍या, नववर्ष स्‍वागतादरम्‍यान बहुतेक क्‍लब्‍स व बारमध्‍ये गर्दी असल्‍यामुळे मला या ठिकाणी जायला आवडत नाही. मी या काळादरम्‍यान घरामध्‍ये शांतमय वातावरणाचा आनंद घेण्याला प्राधान्‍य देते. माझ्या एका मैत्रिणीने नववर्षाच्‍या पूर्वसंध्‍येला तिच्‍या घरी पार्टीचे आयोजन केले आहे. मी मैत्रिणींसोबत स्‍वादिष्‍ट पाककलांचा आस्‍वाद घेण्‍यास आणि गप्‍पागोष्‍टी करण्‍यास उत्‍सुक आहे. आम्‍ही काही गेम्‍स देखील खेळणार आहोत. मी स्‍वत: विचार-मंथन करण्‍याचे कार्य हाती घेतले असून त्‍याबाबत तयारीला देखील सुरूवात केली आहे आणि नियोजनाची आखणी देखील केली आहे. 

मालिका  हप्‍पू की उलटन पलटन मध्‍ये दरोगा हप्‍पू सिंगची भूमिका साकारणारे योगेश त्रिपाठी म्‍हणाले, सुदैवाने आमच्‍या टीमने नववर्षासाठी दोन दिवसाचा ब्रेक दिला आहे, ज्‍यामुळे मी माझ्या कुटुंबासोबत जवळच्‍या हिल स्‍टेशनवर जाणार आहे. माझे शूटिंगचे व्‍यस्‍त वेळापत्रक पाहता मला क्‍वचितच माझ्या मुलांसोबत वेळ व्‍यतित करायला मिळतो. ज्‍यामुळे नववर्ष स्‍वागताने मला त्‍यांच्‍यासोबत अनपेक्षित ट्रिपचा आनंद घेण्‍याची संधी दिली आहे. आम्‍ही भव्‍य साजरीकरणासह २०२४ चे स्‍वागत करणार आहोत आणि मी त्‍यासाठी खूप उत्‍सुक आहे. 

मालिका  भाबीजी घर पर है  मध्‍ये मनमोहन तिवारीची भूमिका साकारणारे रोहिताश्‍व गौड म्‍हणाले,  मी मित्र परिवारांसोबत आरामदायी क्षणांचा, तसेच काही  मी टाइम चा आनंद घेण्‍यास उत्‍सुक आहे. माझ्या मित्रांची फूडप्रती आवड पाहता माझी पत्‍नी आणि मीसायंकाळच्‍या कार्यक्रमासाठी स्‍वादिष्‍ट मेन्यू तयार केला आहे आणि सोबत लाइव्‍ह म्‍युझिक देखील असणार आहे. मला प्रवास करायला आवडते, पण आम्‍ही नववर्षाच्‍या सुरूवातीला पर्यटनाचा आनंद घेणार आहोत. सर्वांसाठी नववर्ष आनंद व सुरक्षिततेने भरलेले असो ही सदिच्‍छा! 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन   कोल्हापूर,(प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठात शि…