Home शैक्षणिक  न्यू वूमन्स कॉलेज ऑफ फार्मसीच्या निकिता लांबोरे चे राज्यस्तरीय स्पर्धेत यश

 न्यू वूमन्स कॉलेज ऑफ फार्मसीच्या निकिता लांबोरे चे राज्यस्तरीय स्पर्धेत यश

0 second read
0
0
59

no images were found

 न्यू वूमन्स कॉलेज ऑफ फार्मसीच्या निकिता लांबोरे चे राज्यस्तरीय स्पर्धेत यश

कोल्हापूर (प्रतिनिधी): येथील श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचलित, न्यू वुमन्स कॉलेज ऑफ फार्मसीच्या कु. निकिता लांबोरे प्रथम वर्ष डी. फार्म हिने श्री संतकृपा शिक्षण संस्था कॉलेज ऑफ फार्मसी, घोगाव यांनी आयोजित केलेल्या राजस्तरीय ई पोस्टर स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक पटकविला. त्याबद्दल तिला प्रशस्तीपत्र व रोख पारितषिक प्राप्त झाले.
या स्पर्धेमधे तिने , इम्पॅक्ट ऑफ डिप्रेशन ऑन हेल्थ अँड सोसायटी ( नैराश्याचे होणारे आरोग्यावर व समाजावर दुष्परिणाम) यंविषयावर सादरीकरण केले. यासाठी तिला प्रा. वैष्णवी निवेकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल तिचा संस्थेमार्फत विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे चेअरमन श्री. के. जी.पाटील, विकास अधिकारी प्राचार्य डॉ. संजय दाभोळे, फार्मसीचे प्राचार्य डॉ.रविंद्र कुंभार, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन   कोल्हापूर,(प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठात शि…