Home राजकीय साताऱ्यात शिवसेनेच्या रणजितसिंह भोसलेंचा शिंदे गटात जाहीर प्रवेश

साताऱ्यात शिवसेनेच्या रणजितसिंह भोसलेंचा शिंदे गटात जाहीर प्रवेश

0 second read
0
0
415

no images were found

साताऱ्यात शिवसेनेच्या रणजितसिंह भोसलेंचा शिंदे गटात जाहीर प्रवेश

सातारा : सातारा पालिकेची निवडणूक जसजशी जवळ येत असतानाच शिंदे गटाला पाठिंबा मिळताना दिसतोय. उदयनराजे आणि शिवेंद्रराजे भोसले यांनी आधीच आक्रमक पवित्रा घेत आमचीच सत्ता येणार, असा दावा केलाय. परंतु, साताऱ्यातील शिवसेनेच्या युवा नेत्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदे गटाला समर्थन दिल्याने  साताऱ्यात शिंदे गटाचं पारडं जड होताना दिसत आहे. शिवाय, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आपला पाठिंबा दर्शवत शिंदे गटात प्रवेश केलाय. त्यामुळं साताऱ्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेना मोठा हादरा बसलाय. शिवसेनेचे साताऱ्यातील युवा नेते आणि युवासेवा जिल्हाप्रमुख रणजित सिंह भोसले हे एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले. मुंबईतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी रणजित सिंहे भोसले यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई हे देखील उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

आमदार अमल महाडिक यांचा हरित कोल्हा

आमदार अमल महाडिक यांचा हरित कोल्हापूरचा संकल्प; शहरात लावणार दहा हजार झाडे कोल्हापूर, (प्र…