no images were found
‘डिजीटल इंडिया’ने लोकांचे जीवनमान उंचावले: डॉ. विजय ककडे
कोल्हापूर(प्रतिनिधी ) : डिजिटल इंडिया सर्वच क्षेत्रात वेगाने प्रगती करत असून त्यामुळे लोकांचे जीवनमान उंचावले आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाच्या भगवान महावीर अध्यासनाचे समन्वयक तथा अर्थतज्ज्ञ डॉ. विजय ककडे यांनी केले.
आकाशवाणीने जी-२० परिषदेच्या निमित्ताने देशभरात तज्ज्ञांची व्याख्याने आयोजित केली होती. या मालिकेअंतर्गत डॉ. ककडे बोलत होते.
‘डिजिटल इंडिया’ विषयावर बोलताना ते म्हणाले, देशात अनेक प्रकारच्या आर्थिक व्यवहारांना गती मिळाली असून वित्तीय समावेशकता वाढली आहे. त्याचबरोबर डिजिटल फसवणूक देखील वाढली आहे. हा धोका लक्षात घेऊन डिजिटल व्यवहार केले पाहिजेत. त्या करीता डिजिटल साक्षरता अत्यंत महत्त्वाची ठरते.
यावेळी कोल्हापूर आकाशवाणी केंद्राचे संचालक डॉ. सुनील गायकवाड यांनी जी-२०चे बोधचिन्ह देऊन डॉ. ककडे यांचे अभिनंदन केले.