no images were found
भारतातील सर्वात मोठे आरोग्यसेवा नेटवर्क मणिपाल हॉस्पिटल्सकडून
पुणे : पुणेकरांसाठी आपल्या आरोग्यसेवांमध्ये वाढ करत मणिपाल हॉस्पिटल्सने रूग्णांसाठी आता कार्यरत असलेल्या नवीन २५०-बेड हॉस्पिटलच्या उद्घाटनाची घोषणा केली. हे हॉस्पिटल आकर्षक व उत्तमरित्या कार्यक्षम असण्यासोबत ३.५५ लाख चौरस मीटर जमिनीवर स्थित आहे आणि शहरातील सर्वात मोठ्या खाजगी हॉस्पिटल्सपैकी एक आहे. नवीन बांधकाम करण्यात आलेले हॉस्पिटल मुख्य बाणेर – महाळुंगे रोड येथे सुलभपणे उपलब्ध आहे. मणिपाल हॉस्पिटल्स ग्रुपने भारतभरातील ४५ लाख रूग्णांचा उपचार केला आहे आणि मागील ६८ वर्षांहून अधिक काळापासून वैद्यकीय सर्वोत्तमतेसाठी ओळखले जाते. बाणेर हॉस्पिटल हे आता नेटवर्कमधील २८वे हॉस्पिटल आहे.
या नवीन केंद्रामध्ये वैद्यकीय सेवांसाठी अत्याधुनिक पायाभूत सुविधांसह अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान आहेत. या हॉस्पिटलमध्ये ६१ आयसीयू बेड्स, चार बोन मॅरो ट्रान्सप्लाण्ट सूट्स, सात मॉड्युलर ऑपरेशन थिएटर्स, सर्वात प्रगत इमेजिंग सर्विसेस्, अत्यंत अचूक रॅडिशन ऑन्कोलॉजी व कॅथ लॅब आहे. हे हॉस्पिटल पुण्यातील मोठ्या प्रमाणातील लोकांच्या गरजांची पूर्तता करेल, अनेक स्पेशालिटीज सेवा देईल, ज्यामध्ये सात सेंटर ऑफ एक्सलन्सचा समावेश आहे जसे न्यूरोसायन्सेस, ऑन्को सायन्सेस, कार्डियक सायन्सेस, रिनल सायन्सेस, गॅस्ट्रोएण्टेस्टिनल सायन्सेस व क्रिटीकल केअर. या नवीन हॉस्पिटलमध्ये रूग्णांना दर्जात्मक तज्ञ सेवा देण्यासाठी विभिन्न स्पेशालिटीजमधील विशेष पूर्ण-वेळ समर्पित कन्सल्टण्ट्स असतील. या नवीन केंद्राच्या उद्घाटनाप्रसंगी मणिपाल हॉस्पिटल्सने मर्यादित सूट असलेल्या लाइफस्टाइल चेक पॅकेजची देखील घोषणा केली आहे.