no images were found
भाजपा नवमतदार नोंदणीला उत्फूर्त प्रतिसाद
कोल्हापूर ( प्रतिनिधी ): भारतीय जनता पार्टीच्या वतीने सातत्याने अनेक लोकोपयोगी कार्यक्रम राबवले जात असतात. याचाच एक भाग म्हणून नवमतदार नोंदणी अभियान राबवण्यात येत आहे. आज शहरातील प्रमुख १६ चौकामध्ये या अभियानाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. २५, २६, २७ ऑगस्ट रोजी हे अभियान राबविण्यात येणार आहे.
भारतीय जनता पार्टीच्यावतीने भगवा चौक, लाईन बाझार चौक, महाराजा हॉटेल चौक, व्हीनस कॉर्नर, सावित्रीबाई फुले रुग्णालय, धर्मवीर संभाजीराजे चौक (दीपक वडा शेजारी), सायबर चौक, साईक्स एक्स्टेंशन, टेंबलाईवाडी चौक, शाहू बँक चौक, साई मंदिर कळंबा, उभा मारुती चौक, सानेगुरुजी वसाहत, गंगावेश चौक, रेणुका मंदिर लक्षतीर्थ वसाहत अशा ठिकाणी मंडप उभारून भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमध्ये नवमतदार नोंदणी अभियान राबवण्यात आले. अनेक नवमतदारांनी या अभियानाचा लाभ घेतला. भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव व प्रमुख पदाधिका-यांनी या सर्व ठिकाणी भेट देऊन नोंदणी कक्षातील कार्यकर्त्यांना प्रोत्साहित केले तसेच युवा नवमतदारांनी आपली मतदान नोंदणी करून लोकशाही बळकट करावी असे आवाहन केले.