Home मनोरंजन आधुनिक तंत्राच्या माध्यमातून स्टार प्रवाहवर अष्टविनायक दर्शन

आधुनिक तंत्राच्या माध्यमातून स्टार प्रवाहवर अष्टविनायक दर्शन

0 second read
0
0
103

no images were found

आधुनिक तंत्राच्या माध्यमातून स्टार प्रवाहवर अष्टविनायक दर्शन

महाराष्ट्राची नंबर वन वाहिनी स्टार प्रवाहवरील सर्वच कार्यक्रम प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. मनोरंजनाचा प्रवाह घराघरात पोहोचवणारी महाराष्ट्राची लोकप्रिय वाहिनी वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांद्वारे देखिल प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असते.  कोविड काळात पडद्यामागे काम करणाऱ्या तंत्रज्ञांच्या घरी बाप्पाची मूर्ती घरपोच करणं असू दे वा मुंबई पोलिसांना भव्यदिव्य वाळूशिल्पाच्या माध्यमातून शुभेच्छा देणं असू दे. स्टार प्रवाह वाहिनीने वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला आहे. यंदा ठाणे येथील तलावपाली येथे मेश या आधुनिक तंत्राच्या माध्यमातून स्टार प्रवाह वाहिनीने अष्टविनायकाचं दर्शन घडवून आणलं. गणपती बाप्पाच्या आगमनासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. मात्र स्टार प्रवाह वाहिनीच्या या अनोख्या प्रयत्त्नातून गणेशोत्सवाच्या आधीच अष्टविनायकाचं दर्शन प्रेक्षकांना घडलं. लहानांपासून ते अगदी मोठ्यापर्यंत प्रत्येकानेच या अनोख्या संकल्पनेचं भरभरुन कौतुक केलं आणि बाप्पाचं दर्शनही घेतलं.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…