Home राजकीय राष्ट्रवादी काँग्रेसकडून विशिष्ठ खात्यांचा आग्रह धरला… मंत्री मंडळाचा विस्तार लांबणीवर पडण्याची शक्यता

राष्ट्रवादी काँग्रेसकडून विशिष्ठ खात्यांचा आग्रह धरला… मंत्री मंडळाचा विस्तार लांबणीवर पडण्याची शक्यता

1 second read
0
0
31

no images were found

राष्ट्रवादी काँग्रेसकडून विशिष्ठ खात्यांचा आग्रह धरला… मंत्री मंडळाचा विस्तार लांबणीवर पडण्याची शक्यता

 

मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेसकडून विशिष्ठ खात्यांचा आग्रह धरला आहे,अशी माहिती सूत्रांनी दिली असल्याचं सांगितलं आहे. म्हणजेच अर्थ, ग्रामविकास, सामाजिक न्याय, ऊर्जा, गृहनिर्माण, महिला आणि बालविकास, आणि अल्पसंख्याक खाती राष्ट्रवादीला हवी आहेत. तसंच, क्रीडा आणि शिक्षण यापैकी एका खात्यावरही अजित पवार गटाचा डोळा असल्याचं समजतंय. मात्र अर्थ खातं अजित पवारांना देण्यास शिवसेनेचा तीव्र विरोध आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

खाते वाटपासंदर्भात अंतिम चर्चेकरीता दोन्ही नेते दाखल झाले होते, अशीही माहिती मिळाली आहे. दरम्यान, सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो. त्यामुळं भाजपच्या अनेक इच्छुकांनी देव पाण्यात ठेवले असून, कुणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊ मंत्र्यांनी 2 जुलै रोजी मंत्रीपदाची शपथ घेतली पण अद्यापही या सर्वांचे खातेवाटप झाले नाही. पण या नऊ जणांनी जरी मंत्रीपदाची शपथ घेतली असली तरी अजूनही काही मंत्रिपदं शिल्लक आहेत. त्यामुळे जोपर्यंत मंत्रीमंडळाचा विस्तार होत नाही तोपर्यंत खातेवाटप होणार नसल्याची शक्यता आहे. त्यामुळे मंत्रीमडळाचा विस्तार झाल्यानंतर खातेवाटप होणार असल्याचं शक्यता आहे.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची रात्री उशीरा बैठक झाली.गेल्या दोन दिवसांपासून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यात बैठका होत आहेत. मंत्रीमंडळ विस्तार आणि खाते वाटपासंदर्भात या बैठका होत असल्याची माहिती मिळत आहे. रात्री देखील वर्षा निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत प्रफुल्ल पटेल देखील वर्षा बंगल्यावर दाखल झाल्याची माहिती मिळाली आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…