
no images were found
अनेकांच्या अनेक गोष्टी आमच्याकडे असल्याचा इशारा : उद्धव ठाकरे
मुंबई : अनेकांच्या अनेक गोष्टी आमच्याकडे असल्याचा इशारा माझी मुख्यमंत्री शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मुंबई येथे कार्यकर्त्यांशी बोलताना दिला.
देवेंद्रजी, तुम्ही तुमचं घर सांभाळा आमच्या घरापर्यंत येऊ नका नाहीतर आम्हाला तुमच्या घरात जावं लागेल नाहीतर हिंदूत्वाची अब्रू निघेल असा इशारा माझी मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिला.
मुंबईतील ठाकरे गटाचे प्रमुख पदाधिकारी-शाखाप्रमुख यांचा शिवाजी मंदिर नाट्यगृहात मेळावा आयोजित करण्यात आला होता.
आमच्या परिवारावर बोलू नका. मी माझ्या परिवाराबाबत संवेदनशील आहे. हा माझा परिवार आहे.. माझा सुरज चव्हाण, शिवसैनिक, महाराष्ट्र माझा परिवार आहे. माझं कुटुंब माझी जबाबदारी, तुमच्या कुटुंबाची जबाबदारी दुसरं कोणी घेत असेल तर माहिती नाही. परिवार बचाओ वगैरे बोलू नका. अनेकांच्या अनेक गोष्टी आमच्याकडे असल्याचा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याना उद्धव ठाकरे यांनी दिला.
एक जुलैला मुंबई महापालिकेवर मोर्चा काढणार आहोत. कोव्हिड काळातील भ्रष्टाचार हे बाहेर काढत आहेत. पण त्या काळात सातत्याने सर्व्हे होत होते मी माझं कौतुक सांगत नाही पण त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे देशात सर्वोत्तम कामगिरी करत असल्याच सर्वेक्षणांचं निरीक्षण होतं. ही यांची पोटदुखी आहे. कारण भाजपच्या एकाही मुख्यमंत्र्याचं नाव या यादीत नाही” असं उद्धव ठाकरे म्हणाले.