Home राजकीय विरोधकांना कामानं उत्तर देतो,” एकनाथ शिंदेंचे रोखठोक प्रत्युत्तर

विरोधकांना कामानं उत्तर देतो,” एकनाथ शिंदेंचे रोखठोक प्रत्युत्तर

0 second read
0
0
103

no images were found

विरोधकांना कामानं उत्तर देतो,” एकनाथ शिंदेंचे रोखठोक प्रत्युत्तर

मुंबईत वज्रमूठ सभा पार पडली. या सभेदरम्यान, उद्धव ठाकरे, अजित पवार यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सरकारवर टीकेचा बाण सोडला. यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी एका कार्यक्रमादरम्यान यावर रोखठोक उत्तर दिलं.आपण आरोपाला आरोपानं नाही, तर कामानं उत्तर देतो असं एकनाथ शिंदे म्हणाले.

“आपण सर्वकाही सामान्य लोकांसाठी करतोय. मुंबईत आपण सुधारणा करत आहोत. मुंबईकर आज जाणून आहे, मुंबई बदलतेय. मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर आहे. देश-विदेशातून लोक येतात. संध्याकाळी त्या ठिकाणी जा, काय रोषणाई दिसतेय हे पाहा. आता पोटदुखी सुरू झालीये आणि ती आणखी वाढेल म्हणून बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरु केलाय. त्या ठिकाणी जाऊन मोफत औषध घ्या, असं म्हणत त्यांनी विरोधकांवर टीकेचा बाण सोडला.

“मी फार काही राजकीय बोलू इच्छित नाही. त्यांना मी कामानं उत्तर देत असतो,” असं म्हणत त्यांनी मंजूर केलेल्या कामांची यादी वाचून दाखवली. आरोपांना आरोपांनी उत्तर देणार नाही, कामानं उत्तर देईन. तुम्ही आरोप करा आम्ही डबल काम करत राहू. महाराष्ट्रातील जनतेला आरोप प्रत्यारोप खालच्या दर्जाची भाषा आवडत नाही. ती आपली संस्कृती नाही. एकनाथ शिंदेकडून कधीही अशा आरोपाला उत्तर दिलं जाणार नाही. कामातून उत्तर दिलं जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जन आरोग्य योजना अधिक पारदर्शक व प्रभावी करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस:न्यू एरा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्‌घाटन

जन आरोग्य योजना अधिक पारदर्शक व प्रभावी करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस:न्यू एरा मल्टी …